Importance of Theatre in Society : मनोरंजनापलीकडे नाटकाची भूमिका; प्रेक्षक, समाज आणि संस्कृतीला समृद्ध करणारी रंगभूमी

Theatre and Cultural Value :** नाटकाचा उपयोग केवळ आर्थिक परताव्यात मोजता येत नाही. प्रेक्षकांना मिळणारा अनुभव, सामाजिक विचारांची देवाणघेवाण आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्यात रंगभूमी महत्त्वाची भूमिका बजावते.
Importance of Theatre in Society

Importance of Theatre in Society

esakal

Updated on: 

आशुतोष पोतदार

रंगमंचीय मांडणीबद्दल मी मागच्या लेखात लिहिलं होतं. त्यावर एका वाचकानं विचारलं, ‘‘अशी वेगळी नाटके उभी करण्यासाठी एवढा खर्च करून त्याचा उपयोग काय?’’ उपयोगाबद्दलचा असा प्रश्न केवळ नाटकाच्या सेट पुरता नसतो. तर, ज्याचं मूल्य फक्त पैशांच्या किंवा एखाद्या दाखवण्याजोग्या परताव्यात मोजता येत नाही, त्यासाठी खर्च का करायचा, असा प्रश्न कला, साहित्य आणि इतर क्षेत्रांबद्दलही विचारला जातो. अशा वेळेस, ‘उपयोगा’च्या प्रश्नाचे उत्तर संवेदनशील व्यक्ती आर्थिक मोबदल्याच्या पलीकडे शोधते.

आपल्याला नाटकाचे साधारण तीन ‘उपयोग’ दिसतील. पहिला म्हणजे नाटक पाहणाऱ्या व्यक्तीला मिळणारा अनुभव. त्यातून आनंद मिळू शकतो, एखाद्या मुद्द्याविषयी नव्याने चिंतन करावेसे वाटू शकते. दुसरा सामाजिक. नाटकातून मांडले गेलेले विचार आणि त्यांची मांडणी यातून समाजात वैचारिक देवाणघेवाण घडू शकते. तिसरा सांस्कृतिक. परंपरा जिवंत आणि प्रवाही राहणं, नवे कलाकार तयार होणं आणि पुढच्या पिढ्यांना या कलेचा अनुभव घेता येणं यांतून समाज अधिक समृद्ध होऊ शकतो.

Loading content, please wait...