
आरती बनसोडे -
bbansodeaarti@gmail.com
आयुष्यात संगत फार महत्त्वाची असते. त्यामुळेच मित्र-मैत्रिणींच्या संगतीचा परिणाम होऊनदेखील चांगली मुलं विकृत आणि आक्रमक बनतात. राग किंवा अहंकार हा किशोरवयीन मुलांमधील हार्मोन्स बदलामुळेदेखील वाढीस लागतो, ज्याला योग्य समुपदेशनाने आटोक्यात आणता येऊ शकते; पण समाजात वाढीस लागलेली ही विकृती, विध्वंसकता आणि आक्रमकता आटोक्यात आणणं कोणा एका-दोघांचं काम नाही. त्यासाठीच सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे.