

Artificial Intelligence in India
esakal
आज तरी भारत या क्षेत्रात जगात सर्वांच्या, म्हणजे चीनच्या पुढे आहे. त्याच्या ‘कौतुकाची थाप’ ‘एफएओ’च्या लोकांनी आमच्या पाठीवर मारली आणि विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सहकार्य करण्याची आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली.
मला गेली ४-५ वर्षे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाने दिवसरात्र गुंतवून ठेवले आहे. आमच्या बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील तज्ज्ञांची टीम शिक्षण आणि शेती या दोन्ही विषयात विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार प्रत्यक्षात मांडत आहे. दृश्यपरिणाम खूपच प्रोत्साहन देणारे, आनंद देणारे आहेत.