Chandrayaan 2 दक्षिण ध्रुवावर झेंडा गाडणारा भारत पहिलाच!

सम्राट कदम
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर असतानाच लँडर 'विक्रम'चा ऑर्बायटर सोबतचा संपर्क तुटला आणि इस्रो प्रमुखांसहीत सर्व देशवासी चिंतेत पडले. असे जरी असले तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडर विक्रम उतरला आहे आणि त्यावर दिमाखात दिसणारा तिरंगाही!

चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर असतानाच लँडर 'विक्रम'चा ऑर्बायटर सोबतचा संपर्क तुटला आणि इस्रो प्रमुखांसहीत सर्व देशवासी चिंतेत पडले. असे जरी असले तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडर विक्रम उतरला आहे आणि त्यावर दिमाखात दिसणारा तिरंगाही! याचाच अर्थ असा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झेंडा गाडणारा भारत पहिला देश ठरला आहे! यात काही शंका नसावी.

आजपर्यंत इतर देशांनी चंद्राच्या विषुववृत्ताच्या (इक्वेटर) आजूबाजूला आपल्या मोहिमा पाठविलेल्या आहेत. आजही दक्षिण ध्रुवावर धाडसाने स्वारी करण्याचा पहिला मान भारताकडेच आहे. 'विक्रम'शी असलेला संपर्क तुटल्यामुळे आपल्याला त्याची सद्यःस्थिती कळत नाहीये, पर्यायाने जे वैज्ञानिक प्रयोग करायचे आहेत ते सुद्धा अडकून पडले आहे. 

विक्रम लॅंडर चंद्रावर कोसळला तरीही करता येणार संशोधन 

- चंद्राभोवती फिरणाऱ्या 'ऑर्बायटर'वर वैज्ञानिक निरीक्षणे घेणारी उपकरणे आहेत. ज्यामध्ये एक्‍स-रे स्पेक्‍ट्रोमिटर, सोलर एक्‍स रे मॉनिटर, इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रोमिटर, मॅपिंग कॅमेरा अशी उपकरणे आहेत. यांद्वारे आवश्‍यक प्रयोग नक्की करता येणार आहेत.

- चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या विक्रम लॅंडरच्या कुपीमध्ये "प्रग्यान' रोव्हर आणि बाह्यभागावर काही उपकरणे लादण्यात आली आहे. 

- ज्यामध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे, वातावरणाचा अभ्यास करणारी उपकरणे, चंद्रावरील भुकंपाचा अभ्यास करणारे सिस्मोमिटर, लेझरमिरर यांसारखी उपकरणे आहेत. 

- जरी चंद्रावर उतरताना लॅंडरचे पाय तुटले तरीही त्यावरील उपकरणे शाबूत राहतील. मात्र "प्रग्यान' रोव्हर बाहेर येऊ शकणार नाही कारण त्याला आवश्‍यक असलेली समतल पृष्ठभूमी विक्रमचे पाय तुटल्यामुळे मिळेलच असे नाही.

- तसेच प्रग्यानला बाहेर काढण्यासाठी विक्रमचा दरवाजा उघडावा लागेल आणि दरवाजा उघडायची ऑर्डर पृथ्वीवरून द्यावी लागणार आहे. परंतु लॅंडर विक्रमसोबत सध्या कोणताही संपर्क नसल्यामुळे सध्या काहीच कळायला मार्ग नाही.

- इस्रोच्या शास्त्रज्ञांना विक्रमशी संपर्क प्रस्थापित करायला यश मिळाले तर आपल्याला काही प्रयोग करणे शक्‍य होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is First who Host Flag on Moon South Poll

टॅग्स