

India sports complex cleanliness issues
esakal
स्वच्छता मग ती कोणतीही असो, घरापासून ते रस्त्यापर्यंत, बगिचांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रुजवलेल्या स्वच्छ भारताच्या संकल्पाची आठवण त्यांच्या जयंती दिवशी होत असते; पण अख्खा भारत देश दूर राहुदे, आपल्या आजूबाजूला किती स्वच्छता असते, हे प्रत्येक जण जाणतो. काही रस्ते, गल्ल्या आणि काही रेल्वे स्थानकांवरील रुळ तर अस्वच्छतेचे माहेरघरच, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. यात भर असते कबुतरांची. कारण अशी जंगली कबुतरे खुल्या जागेपासून थेट बॅटमिंटन संकुलात कसाही प्रवेश करतात आणि मोठा प्रश्न उपस्थित होतो...