

Asian Games Marathon Qualification
esakal
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष जाहीर करण्यात आले. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये २.१५.०४ (दोन तास पंधरा मिनिटे व चार सेकंद) अशी, तर महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये २.३१.५२ (दोन तास एकतीस मिनिटे व बावन्न सेकंद) अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. भारतीय पुरुषांचा राष्ट्रीय विक्रम शिवनाथ सिंग याने दोन तास १२ मिनिटे अशा वेळेत शर्यत पूर्ण करून नोंदवला आहे. ओ. पी. जैशाने दोन तास, ३४ मिनिटे व ४३ सेकंदात शर्यत पूर्ण करीत महिलांमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय महिला धावपटूंना यंदा जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवायची असल्यास त्यांना २.३१.५२ अशा वेळेत शर्यत पूर्ण करावी लागणार आहे. सध्या तरी हा टप्पा ओलांडणे आव्हानात्मक दिसत आहे. १८ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या मॅरेथॉनमध्ये भारतीय महिला धावपटूंचा कस लागणार आहे.