Monsoon in India : पावसाचे अनेक चेहरे; आनंद, वेदना आणि जीवनाचा अनोखा प्रवास

Monsoon in Life and Literature : पाऊस हा केवळ ऋतू नाही, तर भावना, शेती, संस्कृती आणि साहित्य यांना जोडणारा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकासाठी त्याचा अर्थ, आनंद आणि वेदना वेगवेगळ्या असतात.
Monsoon in Life and Literature

Monsoon in Life and Literature

esakal

Updated on

तुम्ही पाऊस आवडणारे, नावडणारे किंवा मोठ्या इमारतींमधले किंवा वस्तीतले, असे कुठलेही असलात तरी आकाशात एकाएकी काळे ढग जमले, गडगडाट झाला, वीज चमकली आणि मग पाण्याचे टपोरे थेंब जमिनीवर झेपावायला सुरुवात झाली की चित्तवृत्ती फुलण्याचा अनुभव एकदा तरी घेतला असेलच. माळेत मणी ओवत जावेत तसे हे पाण्याचे थेंब सरसर खाली येतात आणि चराचर सृष्टीला शांतवतात, तिच्यात सर्जनाचे प्राण फुंकतात.

पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली

दुःखाच्या मंद सुराने

कवी ग्रेस यांच्या कवितेच्या या ओळी पावसाचं वेगळंच चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतात. हे चित्र आल्हाददायक नाही, तर दुखरं, वेदनादायक आहे. अथक पडणाऱ्या पावसाचं आणि त्यामुळे होणाऱ्या दुःखी सुरांचं सूचन यातून होतं. तसं तर कवी, पाऊस आणि दुःख हे समीकरण फार जुनं. ‘दो नैना और एक कहानी थोडासा बादल थोडासा पानी...’ गुलजारांनी त्यांच्या एका गाण्यात ते सांगून ठेवलं आहेच आणि अगदी वास्तवदर्शी विचार केला तर खरंच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, नोकरदार लोकांना पाऊस जितका आल्हाददायक वाटतो तितका तो शेतकरी, वस्ती-झोपडीत राहणाऱ्यांना वाटतोच असं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com