
जयेंद्र लोंढे-jayendra.londhe@esakal.com
दीपा कर्माकरने रिओ ऑलिंपिकमध्ये (२०१६) ऐतिहासिक कामगिरी केली. अर्थात तिला पदक पटकावता आले नाही. तरीही चौथ्या स्थानापर्यंत तिने मारलेली झेप कौतुकास्पद ठरली. दीपाच्या काबिल ए तारीफ प्रदर्शनानंतर भारतात जिम्नॅस्टिक्स या खेळाचे वारे वाहू लागले असले तरी याची खरी सुरुवात आशीषकुमारपासून झाली होती.