diggajanchi patre book
sakal
- सुकृत करंदीकर, editor@esakal.com
कागदावर मन उतरवण्यासाठी आताशा हातात पेन फारसं कोणी धरत नाही. ख्यालीखुशाली सांगण्यासाठी लिहिली जाणारी पत्रं दुर्मीळ झाली आहेत. नोटीस, पोहोच, आर्थिक-कायदेशीर व्यवहार आदी कोरड्या बाबींसाठी टपालाचा वापर होतो. प्रत्यक्ष भेटीसारखा संवाद साधून देणारा मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आल्यानंतर ‘पत्र’ कालबाह्य होणं स्वाभाविक होतं.