फाटका कोट पाहून एका राष्ट्रप्रमुखांनी बिहारच्या भावी मुख्यमंत्र्याना नवीन कोट दिला होता

फाटका कोट पाहून एका राष्ट्रप्रमुखांनी बिहारच्या भावी मुख्यमंत्र्याना नवीन कोट दिला होता

आपण आपल्या मनात ज्या प्रतिमा पक्‍क्‍या करीत असतो, जे समज वागवित असतो ते आणि वस्तुस्थिती यांचा नेहमीच संबंध असतो असे नाही. आणि त्यामुळेच आपली फसगत होते. हे तंतोतंत उदाहरण राजकारणात लागूही पडते. आपल्याकडेही राजकारण्यांविषयी काही समज गैरसमज आहेत. राजकारणी म्हटलं की आपल्या डोळ्यसमोर कडक पांढरे शुभ्र कपडे घातलेली व्यक्ती दिसते. त्यांच्या आलिशान गाड्या आणि मागेपुढे करणारे लोक आठवतात. त्यातही एखादा नेता राज्याचा मुख्यमंत्री म्हटलं की त्यांच्या रुबाबाविषयी न बोललेच बरं. तसेच राजकारणात व्यक्तीला पद मिळाले तर त्याला लागून त्याच्याकडे प्रचंड पैसा येतो असा आपल्याकडे गैरसमज आहे. या धारणेच्या विरुद्ध काम करणारे बोटावर मोजण्याइतके चांगले लोक राजकारणात होते आणि आहेत. या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणाऱ्या नेत्यांमधील एक नाव म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर.

२४ जानेवारी १९२४ रोजी समस्तीपूरच्या पितुंजियात (आताचे कर्पूरीग्राम) जन्मलेल्या कर्पूरी ठाकूर हे एकेकाळ बिहारमध्ये उपमुख्यमंत्री होते, दोनदा मुख्यमंत्री आणि आमदार आणि अनेक दशकांपर्यंत विरोधी पक्षाचे नेते होते. १९५२ मध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभेची निवडणूक एकही निवडणूक हरले नाहीत.अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या त्यांनी बिहारच्या जनतेवर आपल्या कामाची एक वेगळीच छाप टाकली. विशेष म्हणजे ते बिहारचे पहिले बिगर-कॉंग्रेस मुख्यमंत्री होते.

१९६७ मध्ये जेव्हा ते प्रथमच उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी भाषा ही सक्तीची नसेल असा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर भरपूर टीका सुद्धा झाली. पण वास्तविक त्यांनी शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. या काळात इंग्रजीमध्ये मॅट्रिक नापास झालेल्या लोकांची 'आम्ही कर्पूरी विभागातून उत्तीर्ण झालो आहोत' असे म्हणत त्यांची थट्टा केली जात होती. पुढे चालून त्यांना शिक्षणमंत्रीपदही मिळाले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मिशनरी शाळांनी हिंदीमध्ये शिक्षण  सुरू केले. तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब मुलांची शालेय फी माफ करण्याचे कामही त्यांनी केले. ते देशाचे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी आपल्या राज्यात मॅट्रिकपर्यंतचे विनामूल्य शिक्षण जाहीर केले. त्यांनी उर्दूला भाषेला राज्यातील दुसर्‍या राज्य भाषेचा दर्जा दिला. 

1971 मध्ये कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी जमिनीवरील मालगुजारी कर बंद केला. बिहारच्या मुख्यमंत्री सचिवालयाच्या इमारतीची लिफ्ट चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना उपलब्ध नव्हती, ते मुख्यमंत्री होताच चतुर्थ श्रेणी कर्मचारी या लिफ्टचा वापर करू शकतील याची काळजी घेतली.1977 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यामंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंगेरीलाल कमिशनची अंमलबजावणी केली. राज्यातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करून  ते अनेकांच्या निशाण्यावर आले. तरीही कर्पूरी ठाकूर समाजातील वंचित लोकांच्या हितासाठी काम करत राहिले. पुढे जाऊन त्यांनी राज्यातील सर्व विभागांना हिंदी भाषेत काम करणे बंधनकारक केले. एवढेच नव्हे तर राज्यातील राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन आयोग लागू करण्याचे कामही त्यांनी केले होते.

मित्राचा फाटलेला कोट घालून परदेश दौरा

1952 मध्ये कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले. त्याच वेळी,ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी त्यांची प्रतिनिधी मंडळात निवड झाली. परदेशी जाण्यासाठी त्यांच्याकडे कोट नव्हता म्हणून आपल्या मित्राला कोट मागितला. परंतु तो देखील फाटलेला होता. पण कर्पूरी ठाकूर तोच कोट घालून गेले. तेथे युगोस्लाव्हियाचा प्रमुख मार्शल टिटो यांना कर्पूरींचा कोट फाटलेला दिसला. यानंतर मार्शल टिटो यांनी कर्पूरींनाएक नवीन कोट भेट म्हणून दिला. सध्याच्या राजकारणात राजकारणी दिवसातून अनेक वेळा आपले महागडे कपडे आणि ड्रेस बदलण्याविषयी चर्चेत येत असतात तेव्हा अशा कथा अविश्वसनीय वाटू शकतात.

जेव्हा मुलगा आजारी पडला तेव्हा 

1974 मध्ये, कर्पूरी ठाकूर यांच्या लहान मुलाची वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती . पण  त्याचवेळी मुलगा आजारी पडला. मुलाला दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. हृदय शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ही बातमी इंदिरा गांधींना समजताच राज्यसभेच्या एका खासदाराला त्यांनी तेथे पाठवले आणि मुलाला एम्समध्ये दाखल करण्यास सांगितले. मुलाला सरकारी खर्चाने उपचारासाठी अमेरिकेला पाठविण्यास तयार आहोत असे इंदिरा गांधी यांनी सांगितले. कर्पूरी ठाकूर यांना हे कळताच ते म्हणाले मी मरेल पण मुलाच्या उपचारासाठी सरकारी खर्च घेणार नाही. नंतर, जेपीने काही व्यवस्था केली आणि त्याच्या मुलाला न्यूझीलंड येथे पुढील उपचारासाठी पाठविले. 

माजी पंतप्रधान म्हणाले घराचा दरवाजा थोडा उंच करा 

आणखी एक रंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा माजी पंतप्रधान चरणसिंह कर्पूरी ठाकूर यांच्या घरी गेले तेव्हा घरात प्रवेश करताना दरवाजा इतका छोटा होता की चरणसिंह यांच्या डोक्याला तो लागला. यावर चरण सिंह पश्चिम उत्तर प्रदेशच्या खांटी शैलीत म्हणाले, "कर्पूरी, तहे जरा थोडेसे उंच करा". यावर कर्पूरी यांच्याकडून उत्तर आले जोपर्यंत गरिबांची घरे बनत नाहीत तो पर्यंत माझे घर बांधून काय होणार? 

उत्तरप्रदेशातील नेता हेमावती नंदन बहुगुणा यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, "कर्पूरी ठाकूर यांचे आर्थिक संकट पाहता देवीलाल यांनी पाटण्यातील आपल्या हरियाणवी मित्राला सांगितले होते, "जर कर्पूरजींनी तुम्हाला पाच-दहा हजार रुपये मागितले तर तुम्ही त्यांना द्या, ते तुझे माझ्यावरचे कर्ज असेल. नंतर देवीलाल यांनी आपल्या मित्राला अनेकदा विचारले , भाऊ कर्पूरजींनी काही मागितले. प्रत्येक वेळी त्या मित्राला उत्तर दिले, नाही सर, ते काही विचारत नाहीत. असे त्यांचे अनेक किस्से आहेत कि जे त्यांचे साधेपण सिद्ध करतील. 

तथापि, बिहारच्या राजकारणात त्यांनी पक्ष बदलून दबावाचे राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. राजकीय फसवणूकीतही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, लोकांनी जातीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उभे केले, परंतु कर्पूरी बिहारच्या पारंपारिक पद्धतीत कोट्यवधी वंचितांचा आवाज बनवून कायम राहिले.

राजकारणातील कॉंग्रेस पक्षाची राजकीय चाल आणि समाजवादी छावणीतील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा त्यांना समजत होत्या. ते सरकार स्थापनेसाठी लवचिक भूमिका घ्यायचे आणि कोणत्याही पक्षाशी गठबंधन करून सरकार स्थापन करायचे, पण जर त्यांच्या इच्छेनुसार काम झाले नाही तर ते युती  तोडण्यास मागे पुढे पाहत नसत. या धोरणामुळे त्यांचे  मित्र आणि शत्रू दोघेही त्यांच्या राजकीय निर्णयाबद्दल कायम सांशक असायचे. कर्पूरी ठाकूर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने 17 फेब्रुवारी 1988 रोजी निधन झाले.

(संदर्भ - बीबीसी हिंदी, सत्याग्रह हिंदी)

inside story of former CM karpuri thakur who went to foreign trip with torn blazer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com