सावीच्या भन्नाट कल्पना...!

सावीच्या भन्नाट कल्पना...!

झोपायची वेळ झाली होती. आई सावीला अंथरुणात झोपायला जायला सांगत होती. 

आई : झोपेची वेळ झाली आहे बेटा. 
सावी : आई, मला एक गोष्ट ऐकायची आहे. 

आई : बरं, कुठली गोष्ट ऐकायची आहे तुला? 
सावी : आई, मला आज रात्री नेहमीसारख्या गोष्टी नाही ऐकायच्या. 
(सावी हाताची घडी करते आणि तोंड फुगवून बसते.) 

आई : का? 
सावी : मला त्याच-त्याच गोष्टी आता नाही आवडत. 

आई : तू कधी ऐकलंय का, लहानशा मुलीला या गोष्टी आवडत नाही म्हणून? वेडपटच आहे. 
सावी : आई, मला त्या नेहमीच्या गोष्टींचा कंटाळा आलाय. त्या एकसारख्या असतात. 

आई : मग गोल्डीलॉक आणि तीन अस्वल? 
सावी : कंटाळवाणी.... 

आई : बरं मग चॉकलेटचा महाल आणि राजकुमारी, ज्याच्यात राजकुमारी चॉकलेटच्या कारंज्यात अडकून जाते? 
सावी : (जांभळ्या घेत) आई, मी या गोष्टी शंभर वेळा ऐकल्या आहेत. 

आई : हम्म, बरं मग राक्षसाची गोष्ट? किंवा भुताची? गेंडा? एक परी-आजीची गोष्ट? 
सावी : नाही आई, मी आता मोठी झालीय. मला आता भूत किंवा परीकथा नाही ऐकायच्या. 

आई : बरं मग, कुठली गोष्ट तुला ऐकायला आवडेल? 
(सावी आकाशाकडे गहन विचार करत बघते, अचानक तिचे डोळे विस्फारतात आणि ती दणकन उठून बसते.) 
सावी : मला माहीत आहे! एक अशी मुलगी जी नुसतं बोलून काहीही बनू शकते? 
(आई तिला बघून हसते.) 

आई : ही छान कल्पना आहे बेटा. तुला काय बनायला आवडेल सावी? 
सावी : हम्म, आई, तारा बनणे कसे राहील? 

आई : म्हणजे ट्‌विंकल ट्‌विंकल लिटल स्टारसारखा तारा म्हणायचंय का तुला? 
सावी : (खिंदळत) नाही. 
सावी अंथरुणातून बाहेर येते. ती आपला निळ्या रंगाचा फरचा स्कार्फ आणि तारांच्या आकाराचे चष्मे घेते, ते घालून ती पूर्ण रूममध्ये नाचत गात फिरते तिच्या आईला दाखवायला की तिला काय म्हणायचे आहे ते. 
सावी : आई, तू भोळी आहेस. मी कशी दिसतीये? 

आई : खूप छान, खूपच छान. आता काय बनणार आहेस तू? 
सावी : मला विचार करू दे. 
(सावी सगळीकडे शोधते आणि तिला तिचा हिरवा टॉवेल कपाटातून निघालेला दिसतो. ती फरचा स्कार्फ आणि चष्मे फेकून तो टॉवेल कमरेला बांधते.) 

सावी : आई, बघ मी आहे एक सुंदरशी जलपरी, मी माझ्या मासोळ्या मैत्रिणीसोबत समुद्रात पोहत आहे. 
(सावी खेळणे घेऊन पोहायचा अभिनय करते. तिला जमिनीवर लोळताना पाहून आईला हसू येत.) 

आई : तू खूप सुंदर दिसतीयेस. अजून काय बनू शकते तू? 
(सावी थोडा विचार करते आणि ती टॉवेल काढून टाकते, व लाल रंगाची ओढणी चेहऱ्यावर बांधते आणि आपले बोट असे दाखवते जणू ते निशाणेबाज आहे.) 

सावी : आता मी जंगलात राहणारी दरोडेखोर आहे, मी दरोडेखोरांची पुढारी आहे. पोलिस आम्हाला पकडण्याअगोदर आम्ही एका बॅंकेत दरोडा घालू. 

(ती कपाटात जाऊन लपते आणि बाहेर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लाल ओढणी बांधलेली असते. आणि एक प्लॅस्टिकची तलवार असते.) 

सावी : मी माझा गाडलेला खजिना शोधत आहे. सगळे शोधा. खजिना नक्कीच मला मिळेल. (सावी अंथरुणात परत जाते आणि तलवार सगळीकडे फिरवते.) 

सावी : आहा! मला सापडली ती जागा. मला माझं सोनं मिळाले. 
आई : ओहो, सावी किती छान दरोडेखोर आहेस तू. तुला तुझा खजिना मिळाला. 

(आई तिला जोड्यांमध्ये शिक्के लपवताना पाहते. सावी रूमच्या जाऊन बसते आणि ओढणी काढून टाकते. ती आपले हात मागे पुढे फिरवायला सुरवात करते.) 

आई : आता तू काय करतीय बेटा? 
सावी : मी नदीच्या पलीकडे जातीये. 

आई : तू नदीच्या पलीकडे का जातीये? 
सावी : आई, तुला दिसत नाहीये का चिकू पलीकडे अडकला आहे. तो इकडे येऊ नाही शकत 
(आई हसते. सावी पलीकडे जाते. चिकू तिच्या मांडीत जाऊन बसतो. ते दोघे अंथरुणात उडी मारून बसतात.) 

आई : सावी आता झोपायची वेळ झाली आहे. उद्या शाळेत जायचं आहे. 
(सावी पांघरूण घेते.) 
सावी : आई, तू मला आता खरोखर एक गोष्ट सांगेल? 
(आई हसते) 

आई : सावी, मला पुस्तकातून वाचून तुला गोष्ट सांगायची गरज नाहीये. आज रात्री तर तूच एक गोष्ट होती. 
(सावीचे डोळे विस्फारतात.) 
सावी : हो तू बरोबर बोलतेस आहे! आज रात्री तर मी एक गोष्ट होते आई. खूप मज्जा आली. 

(सावी चिकू सोबत पांघरूण घेऊन झोपते, आणि स्वतःचं तोंड थोडं उंच करते, आईला लाइट बंद करून वळल्यावर काही अस्पष्ट आवाज ऐकू येतात.) 

सावी : आई, मी माझा विचार बदलला आहे. मला झोपतानाच्या गोष्टी आवडतात. मी उद्या रात्री परत एक गोष्ट बनू शकते? 
(आई हळूच हसते.) 

आई : हो सावी, कल्पनाशक्ती वापरून तू केव्हाही एक नवी गोष्ट बनू शकते. 
आई वाकून तिच्या कपाळावर एक पापी देते, आणि तिथे दमलेल्या पण आपल्या स्वप्नात हरवलेल्या आनंदी सावीला सोडून झोपायला जाते. 
- ईशा पालकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com