

Ideal civilization
esakal
पृथ्वीवरच्या सर्व सजीवांत माणूस श्रेष्ठ आहे, असे माणूस म्हणतो. पृथ्वीवर खूप-खूप माणसं आहेत. पृथ्वीवरच्या सर्व-सर्व माणसांना विश्वाचे रहस्य जाणायचे आहे. काही माणसे विश्वरहस्याचा शोध घेत आहेत. त्यातून संस्कृती घडते. पृथ्वीवरची सर्व-सर्व माणसे विश्वरहस्याचा शोध का घेत नाहीत?
पृथ्वीवरची सर्व-सर्व माणसे संस्कृतीशी निगडित का होत नाहीत? पृथ्वीवरच्या सर्व-सर्व माणसांना चांगले जगायचे आहे. त्यासाठी माणसांनी व्यवस्था निर्माण केलीय. ही व्यवस्था म्हणजे सभ्यता!
पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या माणूससमूहांनी चांगलं जगायच्या वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत. पृथ्वीवर अनेक सभ्यता आहेत.
एकाही सभ्यतेत सर्व माणसे चांगली जगताहेत, असे घडत नाही. म्हणून मी हवेय!
माणूस मला घडवत नाहीय.
मी त्यांच्या डोक्यातच नाहीय.
मला अजून जन्मायचंय.
मला पृथ्वीवर यायचंय.
मी केव्हा जन्मेन? मी कधी पृथ्वीवर येईन? मी पृथ्वीकडे डोळे लावून बसलेय.
पृथ्वीवरच्या माणसांनो, मला जन्माला घाला.
झोप म्हणाली...