

Jagannath Panda Artist
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
मूळ ओडिशा इथल्या जगन्नाथ पांडा यांच्यावर कोणताही शिक्का मारता येणार नाही. शिल्पकला, रेखाचित्रे, चित्रकला, कोलाज, पेंटिंग्ज, कलात्मक रचना- प्रत्येक कलाक्षेत्र हा त्यांनी अंतिम प्रकार मानला नाही तर एक वैचारिक केंद्र म्हणून विहार केला आहे. पांडा यांच्या कलाकृती जे प्रश्न निर्माण करतात ते भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या जवळ जाणारे आहेत... फक्त त्यात उपदेशाचा आविर्भाव नसतो.
ज गन्नाथ पांडा यांच्या स्टुडिओमध्ये आजूबाजूला काही रेखाचित्रे, काही पेंटिंग्ज, इतकेच नव्हे तर काही वस्त्रकलेचे नमुने. इमारतींच्या बांधणीसाठी तयार केलेले आराखडे आणि त्यासाठी लागणारे सामान आढळेल त्यामागे काही आठवणी गुंतल्या आहेत. पांडा हे मूलतः ओडिशाइथले. ते सध्या बरीच वर्षे दिल्लीत स्थायिक झाले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची क्षेत्रं इतकी विविध आहेत की त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येणार नाही. शिल्पकला, रेखाचित्रे, चित्रकला, कोलाज, पेंटिंग्ज, कलात्मक रचना- प्रत्येक कला क्षेत्र हा त्यांनी अंतिम प्रकार मानला नाही तर एक वैचारिक केंद्र म्हणून विहार केला आहे. त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहते की, तो त्यांचा स्थलांतराचा प्रवास आणि त्या शहरांचा त्यांच्यावर आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर होणारा प्रभाव दर्शवतो.