
शैलेश नागवेकर-shailesh.nagvekar@esakal.com
भविष्याची आर्थिक तरतूद म्हणून फिक्स डिपॉझिटमध्ये काही ठेवी ठेवल्या जातात आणि आर्थिक गरज निर्माण झाली की या ठेवीतील निधी वापरला जात असतो, पण गरज असतानाही ही ठेव तशीच ठेवली तर उपयोग काय? येथे जसप्रीत बुमरा म्हणजे फिक्स डिपॉझिटमधील स्वतःचाच निधी. पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसरी कसोटी म्हणजे आर्थिक निकड आणि अशा वेळीच जर बुमराला तिजोरीतच ठेवले, तर काय परिस्थिती निर्माण होईल? इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात असेच घडले आणि त्यावरून सुनील गावसकर आणि रवी शास्त्रींसारख्या दिग्गजांनी संघ व्यवस्थानासह बुमरावरही टीका केली.