ICC Cricket Schedule Challenges 2026 : वाढत्या लीग अन् सहसदस्य देशांसाठी मर्यादा

Future of Test and ODI Cricket : आर्थिक राजकारण की खेळाचा प्रचार? टी-२० लीगच्या उदंड प्रतिसादामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होत असताना सहसदस्य देशांच्या वाट्याला काय येणार, याचा हा ऊहापोह.
ICC Cricket Schedule Challenges 2026

ICC Cricket Schedule Challenges 2026

sakal

Updated on

जयेंद्र लोंढे

क्रिकेट या खेळातील प्रकार, नियमांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी मेरीलीबोन क्रिकेट क्लब व आयसीसीकडून पुढाकार घेण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वकरंडकात सहभागी संघ स्कॉटलंडचा खेळाडू टॉम ब्रुस याने सहसदस्य देशांना विश्वकरंडकापुरतेच मर्यादित न ठेवता, त्यांचे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत, अशी मागणी केली आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-२० या मुख्य तीन प्रकारांसह विविध देशांमधील वाढत्या लीगच्या प्रभावामुळे हे शक्य होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कसोटी हा प्रकार क्रिकेट या खेळाचा आत्मा, असे म्हणणे या वेळी योग्य ठरेल. पुढे एकदिवसीय प्रकाराचा श्रीगणेशा झाला. त्याचप्रमाणे कपड्यांचे रुपडेही बदलले. रंगीबेरंगी कपडे, सफेद चेंडू, पहिल्या काही विशिष्ट षटकांसाठी रिंगण असा बदल पुढे घडून आला. तिथून आतापर्यंत पॉवरप्ले, कनकशन, सीमारेषेवरील नियम अशा रूपात बदल पाहावयास मिळाले. इंग्लंडमध्ये टी-२० प्रकाराला सुरुवात झाली. हळुवारपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रकार खेळवण्यात आला. आता इंग्लंडमध्ये १०० चेंडूंचा प्रकारही खेळवण्यात येत आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकाराला मान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com