दिलखुलास : गरजा आणि ‘मोल’

एकदा गौतम बुद्धांच्या आश्रमात त्यांच्या अनुयायांमध्ये चर्चा चालली होती, की ‘अनमोल’ काय आहे? या दुनियेत सर्वांत अनमोल गोष्ट कोणती आहे?
Needs
NeedsSakal
Updated on
Summary

एकदा गौतम बुद्धांच्या आश्रमात त्यांच्या अनुयायांमध्ये चर्चा चालली होती, की ‘अनमोल’ काय आहे? या दुनियेत सर्वांत अनमोल गोष्ट कोणती आहे?

- कांचन अधिकारी

एकदा गौतम बुद्धांच्या आश्रमात त्यांच्या अनुयायांमध्ये चर्चा चालली होती, की ‘अनमोल’ काय आहे? या दुनियेत सर्वांत अनमोल गोष्ट कोणती आहे? त्यात कुणी अन्न, पाणी, हवा, निवारा, वस्त्रे, अशा जीवनावश्यक गोष्टी सांगितल्या, तर कुणी सोने, नाणे, हिरे अशा उंची गोष्टी सांगितल्या. शेवटपर्यंत हा वाद संपेना. तेव्हा सर्वांनी असा विचार केला, की आपण गुरुवर्यांनाच विचारूया. ते गौतम बुद्धांकडे गेले. गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनात अपार संपत्ती, वैभव सर्वच अनुभवलं होतं, आणि तरीसुद्धा शांतीच्या शोधात राजपाट त्याग करून वनात जाऊन साधना केली. त्यांना निश्चितच माहीत होतं, की श्रीमंतीत शांती नाही, आणि म्हणूनच ती अनमोल ठरू शकत नाही.

क्षणभर गौतम बुद्ध शांत बसले व उत्तरले, की ‘‘प्रत्येक गोष्ट अनमोल ठरू शकते- जेव्हा ती आपल्या गरजेच्या वेळी उपलब्ध होते. what is given at the time of need is priceless’’ तुमच्याकडे अगदी महाल जरी असेल आणि तुम्हाला वनात चालता चालता तहान लागली, तर त्या क्षणाला ‘पाणी’ हीच सर्वांत अनमोल चीज असणार आहे. भुकेलेल्याला भाकरीची किंमत सर्वांत अधिक असणार आहे. जे लोक कायम भाड्याच्या घरात राहतात, त्यांना स्वतःचं घर असण्याची इच्छा प्रबळ असणार आहे, तरुणाईला लग्नाची गरज असणार आहे, तर वृद्धापकाळात नातवंडांबरोबर शांत निरामय आयुष्य जगावंसं वाटणार आहे. माणसाच्या गरजा स्थळ, काळ, वयसापेक्ष असतात. त्या त्या वेळेनुसार त्या बदलतात. गरजेच्या वेळेला गरजूला ती गोष्टच अनमोल वाटणार आहे.

एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावाहून दुसऱ्या गावी पायी जात होते. जाताना विश्रांतीसाठी म्हणून ते सर्व एका मोठ्या डेरेदार वटवृक्षाखाली विसावले. गौतम बुद्धांनी आपली ध्यानधारणा संपवून वृक्षाखाली विश्रांती घेतली. उठून निघताना, त्यांनी वृक्षाला नमन केले. एका झाडाला गौतम बुद्ध नमन करताना पाहून शिष्य अचंबित झाले व त्यांनी बुद्धांना प्रश्न केला, ‘‘आपण एका झाडाला नमस्कार का केला? काही विपरीत घडले आहे का?’’ त्यावर गौतम बुद्ध हसले व म्हणाले, ‘‘वृक्ष बोलत नसले म्हणून काय झाले? प्रत्येक मानवाची जशी देहबोली असते, तशी ती निसर्गाची, वृक्षाचीही असते. या वृक्षाला नमस्कार करून मी त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला. मी या वृक्षाखाली बसून माझी साधना पूर्ण केली, विश्रांती घेतली. मला या वृक्षाच्या शीतल छायेने खूप प्रेम दिले, ममता दिली. मला इथे शांती प्राप्त झाली. त्यामुळे या वृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे. निसर्गामुळे आपल्याला हवा, पाणी, निवारा मिळतो.

त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा आपला धर्म आहे. तुम्ही सर्वजण या झाडाकडे नीट निरखून पाहा- मी कृतज्ञता व्यक्त केल्यावर झाडाने सध्या त्याला प्रतिसाद दिला आहे. वृक्षाच्या पानांची सळसळ हीच त्याची प्रतिक्रिया आहे. पानांच्या सळसळीतून वृक्ष आपल्याशी संवाद साधत आहे व यापुढेही मी मानवाची अशीच सेवा करत राहीन याची ग्वाहीही देत आहे.’’ लगेचच सर्व शिष्यांनाही वृक्षाला मनापासून वंदन केले व मार्गस्थ झाले.

मैत्रिणींनो, मीसुद्धा माझ्या घरातल्या झाडांना पाणी देताना ‘माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे,’ असं म्हणते. यानं झाडांची वाढ छान होते. याउलट झाडांना वाईट बोललं, त्यांना कोसलं, तर ती मरूनही जातात. तेव्हा सर्वांशीच प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा. नाहीच जमलं तर गप्प तर निश्चितच बसता येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com