Kapil Devsakal
सप्तरंग
तंदुरुस्तीत कपिलच देव!
कसोटी क्रिकेटमध्ये सलग १३१ सामने खेळणारे कपिल देव हे एकमेव वेगवान गोलंदाज. आजच्या खेळाडूंना सतत विश्रांती लागते, ही तुलनाच विचार करायला लावते.
शैलेश नागवेकर -shailesh.nagvekar@esakal.com
तब्बल १३१ कसोटी सामन्यांत दुखापतीमुळे, विश्रांती हवी म्हणून किंवा सामन्याचा ताण आल्यामुळे एकही ब्रेक न घेता सलग खेळणारे कपिल देव एकमेव वेगवान गोलंदाज आहेत. (एका सामन्यात बेजबाबदार फटका मारल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईमुळे तत्कालीन कर्णधार सुनील गावसकर यांनी कपिल देव यांना पुढच्या कसोटीसाठी वगळले होते, हा अपवाद) परंतु दुखापत किंवा तंदुरुस्तीच्या अन्य कोणत्याही कारणामुळे कपिल देव त्यांच्या अख्ख्या कसोटी कारकिर्दीत ब्रेक घेतला, असे झाले नाही.