Jugadu Caps Business Story : एका उंदराने टोप्या विकून कमावली राजापेक्षा जास्त संपत्ती; 'जुगाडू कॅप्स'चा नेमका गेम प्लॅन काय?

Creative Entrepreneurship Narrative : वाणिज्य शाखेच्या कर्तारसिंग उंदराने 'जुगाडू कॅप्स' द्वारे राजाच्या टोपीला आव्हान देत जागतिक कीर्ती मिळवली असून, राजकीय नरेटिव्ह आणि मार्केटिंगच्या जोरावर त्याने आपला टोप्यांचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे नेऊन ठेवला आहे.
Jugadu Caps Business Story

Jugadu Caps Business Story

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी- sarikachatuphale.kulkarni@gmail.com

कर्तारसिंग हा उंदीर नुकताच वाणिज्य शाखेचा पदवीधर होऊन महाविद्यालयातून बाहेर पडला होता. खरे तर वाणिज्य शाखेत काहीच भविष्य नाही, असे त्याला त्याचे आई-बाबा कितीतरी वेळा सांगत असत. पण कर्तारसिंगला विज्ञान आणि कला या शाखांमध्ये शिक्षण घेण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. त्यातल्या त्यात वाणिज्य शाखेत जरातरी काही मिळेल, तिथून बाहेर पडल्यावर कुठला तरी धंदा चालू करावा आणि तुफान पैसे कमवावेत असे त्याला वाटत होते. आता न ऐकता वाणिज्य शाखेत गेलाच आहे तर किमान त्याने सीए वगैरे तरी व्हावे असे आई-बाबा म्हणत असत. पण त्याने ऐकले नाही.

कुठलातरी व्यवसाय करावा हे कर्तारसिंगच्या डोक्यात पक्के होते. हल्ली कशाची चलती आहे, येणाऱ्या काळात कुठले व्यवसाय उत्तम चालू शकतात याचा अभ्यास त्याने केला. मित्रांशी चर्चा केली. काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आपल्या भारतात त्याची परिषद देखील भरलेली होती. तर तू त्या संदर्भात काही व्यवसाय करता येतो का ते बघ. काही मित्रांनी त्याला एखादा रोबोट तयार करता येतो का ते बघ असाही सल्ला दिला. पण उंदीर सरळ म्हणाला, ‘‘रोबोट तयार करायला मी काय गलगोटीया विद्यापीठाचा विद्यार्थी थोडीच आहे.’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com