‘आळसात वेळ घालवू नका. मला प्रश्न विचारा. डास नष्ट का केले पाहिजेत ते विचारा.’ समितीच्या शाळेतून आवाज येत होता. अठरा वर्षांची मोयना मुलांना सांगत होती. त्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त करत होती. कारण प्रश्न विचारणं ही एका सुंदर बदलाची सुरुवात असते हे तिने स्वतः अनुभवलं होतं! उत्तरं शोधण्यातला आणि उत्तरं मिळाल्यानंतरचा आनंद हवा असेल, तर आधी प्रश्न तर पडायलाच हवेत, नाही का? थोडक्यात काय तर ती स्वतः आठ वर्षांपूर्वी जशी होती तसं मुलांनी असावं असं तिला वाटत होतं.