
अक्षय शेलार-shelar.abs@gmail.com
टोरांटोमधल्या एका लहानशा कन्विनियन्स स्टोअरच्या अर्थात आपल्याकडील भाषेत जनरल स्टोअरच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘किम्स कन्विनियन्स’ ही मालिका पाहायला जितकी हलकीफुलकी वाटते, तितकीच ती खोल सामाजिक आशय आपल्यासमोर मांडते. एका स्थलांतरित कोरियन कुटुंबाचं हे चित्रण विनोदाच्या धाटणीने मांडलेलं असलं तरी त्यामागं वंशिक द्वेष, परकेपणाची जाणीव आणि दोन पिढ्यांतील विसंवाद आणि संघर्ष असे सारे काही दडलेले आहे. त्यामुळेच मालिका रोजच्या छोट्या-मोठ्या संघर्षांमधून, एका कुटुंबाच्या माध्यमातून समाजाच्या अनेक स्तरांना हात घालते.