

Latest Marathi Book Reviews
esakal
कथक नृत्यांगना आणि ईशावास्य गुरुकुलमच्या आचार्या डॉ. नीलिमा देशपांडे यांनी त्यांना भावलेल्या विठ्ठलाचं वर्णन, त्याबद्दलचं चिंतन, भावावस्था... हे सर्व ‘विठ्ठल.in’ या आपल्या पुस्तकात मांडलं आहे. कविता आणि त्याबद्दलचे ललितलेखन असं या पुस्तकाचे स्वरूप आहे. ही केवळ अध्यात्मिक अनुभवांची मालिका नाही, तर ती एका भक्ताच्या अंतरंगातील उत्कट भावाजागृतीची वाटचाल आहे. विठ्ठलनामाच्या गजरातून उमटलेल्या ओव्या आणि त्यांचा अर्थ, अनुभव आणि परिणाम या सर्वांचा सुंदर समन्वय देशपांडे यांच्या लेखनात दिसतो. त्यांची भाषा अत्यंत सहज-सोपी, भावगर्भ आहे. ‘रंग काळा भाळी टिळा, तुळशीची माळा शोभतसे/ मकर कुंडल वरी पितांबर, विटेवरी रूप दिव्य दिसे//’ अशा शब्दांत देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वैशिष्ट्य : ह.भ.प. चैतन्य महाराज दैगलूरकर यांची प्रस्तावना. पुस्तकाला अनुक्रमणिका नाही, कुठूनही वाचता येईल.
प्रकाशक : उषा पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : ११२ मूल्य : १२० रु.