

ऋषिराज तायडे rushirajtayde@gmail.com
जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अर्थात महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये सुरू आहे. त्रिवेणी संगमावर भाविकांचा जनसागर उसळला आहे. दुसरीकडे तंत्रविश्वातील कुंभमेळा म्हणून ओळखला जाणारा जगातील सर्वात मोठा आणि तितकाच प्रतिष्ठित टेक शो ‘सीईएस-२०२५’ नुकताच अमेरिकेतील लास वेगासमध्ये पार पडला. आपण कधी विचारही न केलेल्या किंबहुना आपल्या कल्पनेपलीकडील अनोखे तंत्रज्ञान आणि त्याच तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून आपले भविष्य अधिक सुकर करू पाहणाऱ्या आविष्कारांनी उपस्थितांना मात्र अक्षरशः वेड लावले. या तंत्रमेळ्यात कोणकोणते नवनवे तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणे सादर झालीत, त्याचाच एक आढावा...