- प्रा. विनया क्षीरसागर, editor@esakal.com
संस्कृत भाषा म्हणजे प्राचीन भाषा, अभिजात भाषा, पवित्र भाषा अशी अनेक रूपाने या भाषेची ओळख आहे. जगातील आदिम साहित्य, आदिकाव्य या भाषेमध्ये आहे. ही भाषा ललित साहित्याची, महाकवींच्या काव्याची अभिजात रचनांची जशी भाषा आहे तशीच ती शिक्षणाची माध्यम भाषा सुद्धा होती.