''बालवाडी''!

life lesson story for children
life lesson story for childrenesakal

श्लोकच्या शाळेचा आज पहिला दिवस. सकाळपासून त्याची मम्मी उठवतीय त्याला. पण श्लोक कसला डोळे उघडतोय.

"मला नाही जायचं त्या स्कूलमध्ये" हेच त्याचे पालुपद. श्लोकच्या पप्पांची नुकतीच या नवीन गावी बदली झालेली. नवीन गावी आल्यावर परवा एडमीशन घ्यायला गेला तो मम्मी पप्पांबरोबर. तेव्हाच त्याच्या डोळ्यातली नाराजी दिसली मम्मीला.

"श्लोक..आता हे तुझं नवीन स्कुल बरं का"

"मी नाही जाणार त्या स्कूलमध्ये" श्लोकने तेव्हाच सांगितलं.

पण होईल हळुहळु सवय त्याला या नवीन शाळेची असं त्याच्या मम्मीला वाटलं.

कसाबसा त्याला उठवला, तयार केला.

"मला नको तो युनिफॉर्म. माझा माझा तो व्हाईट युनिफॉर्मच पाहिजे मला"

"अरे आता आपली ही नवीन स्कुल आहे ना. मग युनिफॉर्म पण नवा. बघ किती छान आहे... ब्ल्यु कलरचा".

केला तयार अखेर त्याला शाळेत जाण्यासाठी. त्याच्या मम्मीने त्याला शाळेत नेऊन सोडवले. निघताना श्लोक रडवेला झाला. नको होती त्याला ही नवीन शाळा. बेंचवर बसला होता.. मान खाली घालुन. मम्मीला त्याला सोडवुन जात नव्हते. पण टीचरनी सांगितलं, तुम्ही जा..काही काळजी करु नका.

आणि खरंच त्या टिचरही चांगल्या होत्या. त्यांनी श्लोकला खुप माया लावली. दोन तीन दिवसांत श्लोक शाळेत रमला. नवीन सवंगड्यांसोबत टिफीन खाऊ लागला. मधल्या सुट्टीत खेळु लागला. त्याच्या चेहर्यावरचा आनंद, टवटवीच सांगत होती.. तो आता या शाळेत रमला.

life lesson story for children
मजाच मजा...!

आपल्या नवीन घराच्या बाल्कनीत छानसं गुलाबाचं झाड लावायचं होतं श्लोकला. मम्मीच्या मागे लागला तो काल शाळेतुन आल्यापासुन. संध्याकाळी ते मग जवळच्याच एका नर्सरीत गेले. किती विविध प्रकारची रोपे. लहान, मोठी. ते लावण्यासाठी लागणाऱ्या कुंड्या.. सिरामिक पॉटस्..रंगीबेरंगी दगड..खडे. श्लोकला हे घेऊ की ते घेऊ असं झालं. त्याच्या मम्मीने मग छान, छोटसं गुलाबाचं रोप घेतलं. त्याला एक सुंदर फुलही आलेलं. आणि दोन नाजुक कळ्या.

बाल्कनीत एका कोपऱ्यात मग त्यांनी एक कुंडी ठेवली. रोपाभोवती असलेली प्लॅस्टिकची पिशवी काढुन टाकली. हळुवार हाताने मुळांना धक्का न लावता कुंडीत ते रोप लावले. पाणी घातले.

सकाळी जाग आल्यावर श्लोक धावतच बाल्कनीत गेला. त्यानं पाहीलं तर त्या रोपाने मान टाकली होती. कालचे ते टवटवीत फुलंही कोमेजून गेलं होतं. श्लोकचा चेहराही कोमेजला.

"मम्मी.. आपलं झाड मेलं"

म्हणत तो घरात आला. त्याच्या मम्मीने त्याला पुन्हा बाल्कनीत आणलं. समजावलं.

"अरे मेलं नाही बेटा ते झाड. आपण त्याची जागा बदलली ना. म्हणून ते कोमेजलं आहे. दोन तीन दिवस जाऊ दे. मग बघ, कसं पुन्हा टवटवीत होतं ते"

श्लोकला काही ते पटेना. मग मम्मीनेच त्याला समजावून सांगितलं. तु कसा शाळा बदलल्यावर हिरमुसला झाला होता. रडत होता. आणि मग दोन तीन दिवसांनी शाळेत रमला. रोपांचही तसंच असतं.

आणि मग श्लोकनेही त्या लहानश्या रोपाला माया लावली. जाता येता त्या रोपाशी बोलु लागला. त्याच्या निस्तेज पानांवरुन त्याने हळुवारपणे हात फिरवला. दोन तीन दिवसातच त्या गुलाबाच्या रोपाने आपली मुळे मातीत घट्ट रुजवली.आणि ते रोपही मग नव्या जागी रमलं... रुजलं नव्या दिमाखात! टवटवीत नजरेने ते श्लोककडे पाहु लागलं. त्याच्या कळ्या उमलु लागल्या.

'मुले म्हणजे फुले', 'झाडांनाही मन असतं' ...ही पुस्तकात शिकवलेली वाक्ये श्लोकने प्रत्यक्ष अनुभवली ती अशी.

अश्याच शाळेत बागडणाऱ्या मुलांकडे पाहुन एका कल्पक नर्सरी मालकाने आपल्या नर्सरी बाहेर बोर्ड लिहिला होता..

नर्सरी?

छे छे!

ही तर रोपांची बालवाडी.

- सुनील शिरवाडकर, नाशिक

life lesson story for children
काहीतरी बात आहे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com