Marathi Folk Art : लोककलावंतांच्या समृद्ध परंपरेचा सार्थ मागोवा

Maharashtra’s Rich Folk Art Tradition : ‘लोकरंगनायक’ ग्रंथातून महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा उलगडतो; कीर्तन, तमाशा, शाहिरी, गोंधळ आणि भारूडाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या लोककलावंतांचे जीवनकार्य प्रभावीपणे समोर येते.
Marathi Folk Art

Marathi Folk Art

esakal

Updated on

सत्यजित खांडगे - saptarang@esakal.com

महाराष्ट्राला लोकसंस्कृती आणि लोककलांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. अनेक मान्यवर लोककलावंतांनी लोककलेला केवळ राज्य पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठा नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यातील काही प्रतिथयश पुरुष लोककलावंतांचे चरित्रदर्शन डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायक’ या ग्रंथातून घडते. या आधी त्यांच्या ‘लोकरंगनायिका’ या ग्रंथातून स्त्री लोककलावंतांचे चरित्र वाचकांसमोर आले आहे.

‘लोकरंगनायक’ हे केवळ परिचयपर किंवा चरित्रात्मक लेखन नसून हा महाराष्ट्रातील लोककलांचा घेतलेला सैद्धांतिक घेतला आहे. अत्यंत ओघवत्याशैलीत डॉ. खांडगे यांनी कीर्तन, तमाशा, शाहिरी, गोंधळ, भारूड आशा विविध लोककलांना आणि त्या कलेला जागतिक पातळीवर मान मिळवून देणाऱ्या लोककलावंताचा समग्र जीवनपट मांडला आहे. विठ्ठलमुक्तीचा लढा लढणारे रामदासबाबा मनसुख, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा सातासमुद्रापलीकडे घेऊन जाणारे पद्मश्री शाहीर कृष्णाराव साबळे, शाहिरांचे मुकुटमणी आत्माराम पाटील, वीररसयुक्त शाहिरीचे अग्रणी शाहीर बापूराव विभूते, तमाशा क्षेत्रातील अढळ तारा दत्तोबा तांबे शिरोलीकर, विनोदवीर पद्मश्री रघुवीर खेडकर, विनोदाची जोडगोळी काळू-बाळू, रंगभूमी आणि लोकरंगभूमी यातील महत्त्वाचा दुवा असलेले अशोक परांजपे, डॉ. रामचंद्र देखणे, पद्मश्री परशुराम गंगावणे अशा मान्यवरांच्या अलौकिक लोककलेचे दर्शन या पुस्तकातून घडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com