Marathi Grammar and Literature : व्याकरण, चित्रकला आणि साहित्याचा सुवर्णसंगम; मराठी भाषेची नेटकी ओळख करून देणाऱ्या माधुरीताईंचे कार्य

Creative Writing Techniques Marathi : मराठी भाषेचे व्याकरण आणि सौंदर्य 'लिहावे नेटके'द्वारे उलगडणाऱ्या ज्येष्ठ लेखिका व चित्रकार माधुरी पुरंदरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या 'मी' पणा विरहित समृद्ध सांस्कृतिक प्रवासाला मानवंदना देणारे हे विशेष मुक्तपत्र.
Marathi Grammar and Literature

Marathi Grammar and Literature

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

मी अनेक वेळा लिहावे नेटके पाहिलं, वाचलं आहे आणि दर वेळी तुम्ही केलेलं हे काम पाहून थक्क झालो आहे. व्याकरण, चित्रं, भाषाशास्त्र आणि वेगवेगळ्या शैलीतलं ललित साहित्य यांचं मिश्रण यात आहे. व्याकरण, भाषा समजावून सांगताना उदाहरण म्हणून छोट्या छोट्या रूपक कथा, गोष्टी, उतारे, प्रसंग, कविता असे विविध लेखनप्रकार रचले आहेत. एवढंच नाही त्याला पूरक चित्रंही काढली आहेत. फोटो वापरले आहेत. यातले स्वाध्याय हे ‘स्पून फीडिंग’ करणारे नाहीत, तर विचार करायला लावणारे, प्रत्यक्ष कृती करायला लावणारे आहेत.

माधुरीताई पुरंदरे यांस...

तुम्हाला असं जाहीर पत्र लिहावं की न लिहावं, याचा खल हे सदर सुरू झालं तेव्हापासून मनात चालला होता... तुमची प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न मनात यायचा आणि दरवेळी हे लिहायचं पुढे ढकलत राहिलो... पण परवा एक मे, महाराष्ट्र दिन झाला. तेव्हा ठरवलं, समस्त महाराष्ट्रीयनांसाठी, मराठी भाषिकांसाठी तुम्हाला हे पत्र लिहावं...

माझ्या पिढीने तुमचं रंगमंचावरचं काम पाहिलं असण्याची शक्यता फार थोडी आहे. निदान मी तरी ते पाहिलेलं नाही. मी फक्त तुमच्या कामाचं कौतुक ऐकून आहे. ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकात तुम्ही म्हणे एखाद्या झंझावातासारख्या रंगमंचावर यायचात... अनेकांनी मला हे सांगितलं आहे आणि दर वेळी मला हे नाटक न पाहिल्याची रुखरुख मनाला लागली आहे. मला माहितेय, स्वतःचं कौतुक करणं तुम्हाला आवडत नाही किंबहुना तुमच्या बोलण्यात ‘मी’ हा शब्दच नसतो, हे किती ऑड आहे आजच्या काळात!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com