

Mahabharata war
esakal
‘महाभारत’ हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे महाकाव्य आणि सर्वांत मोठे साहित्य समजले जाते. ती केवळ कौटुंबिक कलहाची कथा नसून, युद्धशास्त्राचा तो एक महान ग्रंथ आहे. या काळात शस्त्रास्त्रांचा विकास चरमोत्कर्षावर होता. ग्रंथात ‘मुक्त’ (फेकले जाणारे), ‘अमुक्त’ (हातात धरून चालवले जाणारे), ‘मुक्तामुक्त’ (फेकून किंवा हाताने धरून वापरता येणारे) अशा शस्त्र प्रकाराचे उल्लेख येतात. मंडलावर्त, कौशिक, यमक, गोमूत्रक इत्यादी डावपेचांचे तसेच नाराच, भल्ल, क्षुरप्र, वत्सदंत, निस्त्रींश, परिघ, दंड, स्थूणा, गुड, लोखंडी व सुवर्णजडित गदा इत्यादी अनेकविध शस्त्रांचे उल्लेख येतात.