

Maharashtra Politics
esakal
महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांच्या निवडणूक निकालांवर भाजपचे वर्चस्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप स्पष्ट आहे. झपाट्याने नागरीकरण आणि शहरीकरण होणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांच्या दृष्टीने यापुढील काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. विकासाच्या नियोजनाला आज गांभीर्याने घेतले, तर उद्याच्या संपन्न शहरांची पायाभरणी होईल; अन्यथा....
महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा लोटला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तीन ते सहा वर्षे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या महापालिकांचा कारभार आता लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती परतला आहे. लोकशाहीमध्ये प्रशासनानं दीर्घकाळ आणि निरंकुशपणानं सत्ता बाळगणं अभिप्रेत नाही. अंतिम सत्ता लोकनियुक्त प्रतिनिधींकडं, म्हणजे पर्यायानं लोकांच्या हाती असणं जरुरी आहे. तसं ते घडलं, ही एक फार मोठी गोष्ट या निवडणुकीनं केली.