Jain caves Maharashtra : महाराष्ट्रातील जैन लेण्यांचे सांस्कृतिक वैभव; 'महाराष्ट्रातील जैन लेणी' पुस्तकाचा सखोल आढावा

Jain caves Maharashtra : महाराष्ट्रातील जैन लेण्यांचा इतिहास, स्थापत्य, शिल्पकला, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ व धार्मिक महत्त्व ‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ या पुस्तकात सविस्तर व आकर्षकपणे सांगितले आहे.
Jain caves Maharashtra

Jain caves Maharashtra

sakal

Updated on

रोहित वाळिंबे

भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये जैन तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र स्थान आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांची शिकवण देणाऱ्या या विचारधारेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवातही मोलाची भर घातली असून, राज्यातील जैन लेण्या त्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत. काळाच्या ओघात काहीशा अपरिचित होऊन गेलेल्या याच लेण्यांची विस्तृत ओळख सरला भिरूड यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com