- केदार फाळके, editor@esakal.com
महाराष्ट्रातील लोक शूर, काटक, चिवट, आक्रमक आणि स्वातंत्र्यप्रिय आहेत. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या हे इथले, या प्रदेशाचे मोठे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे शेती करणे सोईचे होते. दोन डोंगररांगांमध्ये असणारा प्रदेश, भूमी, नद्या, खेडी यांना खोरी म्हणतात. या खोऱ्यांची नावे त्यांच्यामधून वाहणाऱ्या नद्यांवरून पडली आहेत. ही खोरी म्हणजे मावळ प्रांत आणि येथे राहणारे लोक म्हणजे मावळे होय. शाहजी राजांकडे १६३६ पासून १६५७ पर्यंत पाच परगणे मुकासा म्हणून होते. एकूण मावळे बारा असून त्यापैकी नऊ शाहजी राजांना मुकासा मिळाली होती.