Marathi Book : अतरंगी भटकंतीतील वास्तवदर्शी अनुभव

Mukund Kulkarni’s Unusual Experiences : मुकुंद कुलकर्णी यांच्या पुस्तकातील चाळीसहून अधिक अनुभव अरुणाचलपासून चंबळपर्यंतची सफर घडवतात; आनंद, रोमांच, मानवी विरोधाभास आणि अभावग्रस्त वास्तवाचा संवेदनशील पट उलगडतात.
Mukund Kulkarni’s Unusual Experiences

Mukund Kulkarni’s Unusual Experiences

esakal

Updated on: 

अजित कानिटकर - saptarang@esakal.com

मन रुतले क्षण : अतरंगी अनुभवांचं गाठोडे’ हे मुकुंद कुलकर्णी यांचे पुस्तक जसे गोधडीसारखे उबदार लेखन वाचकाला अनुभवायला देते, त्याचप्रमाणे उबदार वातावरणात पहाटेची स्वप्ने पाहत रमू पाहणाऱ्याला लगेच जमिनीवर आणून अस्सल घोंगडीचाही खरखरीत स्पर्श करून निर्दय वास्तवाचा आरसा दाखवते. कुलकर्णी यांच्या अशा चाळीसहून अधिक क्षणांमधून उलगडलेला हा अतरंगी पट अरुणाचल-नागालँड-विदर्भ-चित्रकूट, उत्तरप्रदेश अशी ‌सफर घडवून आणतो.

ही ‘सफर’ लेखक शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध अशा पंचेद्रियांनी अनुभवून आपल्यासमोर मांडतात. मात्र, सरतेशेवटी या ‌‘सफरी’चा शेवट वाचकाच्या अंतर्मनाला ढवळून टाकतो. लेखक ‘सफरिंग’मधून ‘उत्सव’ साजरा करत रममाण झालेला असतो, तरी पुस्तक हातातून सोडल्यानंतर मागे मात्र ठेवून जातो एक विषण्ण, उदासी-हतबलता आणि अभावग्रस्ततेची नेणीव. एखाद्या सराईत चित्रपट बनवणाऱ्या कॅमेरामनसारखे लेखकाने ते टिपले आहेत. कधी त्यात अरुणाचलला एका प्रसिद्ध संस्थेने चालवलेल्या ‌‘ओयान’ गावाच्या शाळेतील ५०-१०० आदिवासी मुलांची ‌‘भुतावळ’ घेऊन अमावस्येच्या उजळ चांदण्या रात्री घनदाट जंगलात पायवाट तुडवीत केलेली सहल असते, तर कधी रौद्ररूप धारण करणाऱ्या ब्रह्मपुत्रेत नवविवाहित कुलकर्णी दाम्पत्यांचा लग्नानंतरचा पहिलाच रोमांचक प्रवास दिसतो.  

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com