मनमोराचा पिसारा - एकमेका साहाय्य करू...

व्यापारी असोत की कर्मचारी असोत एकत्र जमले की त्यांची शक्ती लक्षणीय
एकमेका साहाय्य करू
एकमेका साहाय्य करूsakal

संघटनेची शक्ती आज सर्वश्रेष्ठ ठरत आहे. व्यापारी असोत की कर्मचारी असोत एकत्र जमले की त्यांची शक्ती लक्षणीय ठरते. यासाठी गरजेचे असते ते सहकार्य. खरे तर सहकार्य ही एक मनोवृत्ती आहे. जीवन जगण्याची पद्धती आहे. घरात आणि घराबाहेर एकमेकांना ''साहाय्य'' हाच उत्तम पाया असतो जीवन जगण्याचा.

एकतेचे बळ मिळवायचे असेल तर त्यासाठी परस्पर भांडणे, कुरघोडी, खुर्चीचा मोह, पायखेचूपणा व त्यापायी घडणारे अनर्थ याची गरज नाही. आपल्याला गरजेचं आहे साहाय्य. जे परस्पर सौहार्दातून तयार होणारे, कोणीही आपल्यावर न लादलेले, आपल्या मनातूनच फुललेले असेल. समविचारी मंडळींनी एकत्र येऊन, जगण्याची एकसमान पद्धती स्वीकारल्यामुळे निर्माण होणारा सहकार, जिथे भावनांचा ओलावा असेल, दुस-यांबद्दल प्रेम, आत्मियता, ममत्व असेल.

एकमेका साहाय्य करू
Mumbai : धारावीत चिमुकल्यावर काकीकडून लैंगिक अत्याचार

भारतीय संस्कृतीने सहजीवनाला आत्यंतिक महत्त्व दिले आहे. पतिपत्नी एक कुटुंब, नातलग हे सगळे मिळून एखादे कार्य सुकर पार पडत. पतीच्या कामात पत्नीने साहाय्य करावे हे जणूकाही विधिलिखितच असल्याप्रमाणे अपेक्षितच असते, तसेच पतीचेही कर्तव्य आहे की आपल्या पत्नीला साहाय्य करावे. ती जशी प्रत्येक वेळी पाठीमागे साहाय्य करण्यास ठाम उभीच असते तसेच पतीनेही तिला तिच्या कामात मदत करायलाच हवी. मी पुरुष आहे ही बायकी काम मा का करावी? असा अहम नसावा. पत्नीसुद्धा एक व्यक्तीच आहे तिला देखील जबाबदा-या असतात.मग जर त्यात एकमेकांचे साहाय्य मिळालं तर नव्या उमेदीनं,जोमानं, उत्साहाने ती सारं करेल यात शंकाच नाही. आणि मग '' विना सहकार नही उद्धार'' हे नक्कीच पटेल.

''दुस-यांचा विचार स्वतःच्या आधी करणे'' हा सुखी कुटुंबाचा पाया आहे. त्याचप्रमाणे ''मी'' ऐवजी ''आम्ही'' आणि माझे ऐवजी ''आपले'' हे शब्द केवळ बोलण्यापुरतच नव्हे तर मनातून आले की कुटुंबाचा एकसंघपणा निश्चितच अभंग राहतो.'' स्व आधी इतरांचा विचार'' हे तत्त्व तर आज आपल्याला अधिक विस्तृतपणे वापरण्याची गरज आहे. तसेच एका स्त्रीने दुस-या स्त्रीप्रती सहकार्याची भावना ठेवणे हे तर त्याहूनही गरजेचे आहे हेच खऱ्या उन्नतीचे द्योतक आहे.

एक ऊस मोडता येणे शक्य आहे. मात्र त्याच उसांची मोळी केली तर पैलवानालाही ती मोडता येणे शक्य नाही. फार मागे जायला नको. शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याकडे नजर टाकुया. बालपणातच स्वराज्याचे सुंदर स्वप्न त्यांनी पाहिलेले आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा दृढसंकल्प केला. औरंगजेबाच्या बलाढ्य सैनिकांसमोर, साधे मावळे अशिक्षित, स्वतःच्याच अडचणी सोडवत हताश झाले होते. महाराजांनी त्यांच्यात मराठी अस्मितेची फुंकर घातली.

एकमेका साहाय्य करू
नागपूर : कधी थांबेल शिशूंचा मरण प्रवास?

'छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सामान्य असले तरी त्यांची शक्ती असामान्य ठरली ती एकमेकांच्या सहकार्यामुळे, संघटित शक्तीमुळे. ही शक्ती देशासाठी, समाजासाठी, आपल्या माणसांसाठी त्यांचे मनोधैर्य, प्रेरणा, आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी फार उर्जात्मक ठरते. आपण एकमेकांना साहाय्य केले तर समाजाला इष्टतेकडे झुकविण्याची ताकद आपल्या मनगटात येईल व सुयोग्य समाजनिर्मितीची प्रचंड सृजनक्षमता आपल्या सर्वांच्या हातात येईल.'

- अंजली घंटेवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com