

Book Recommendations Marathi
esakal
वेगवेगळे देश फिरण्याचा छंद असलेल्या श्वेता चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘प्रवासरंग’ ही अनुभवगाथा आहे. स्वतः प्रवासाची आखणी करून, त्यांनी अर्धे जग पाहिले आहे. स्वतः आखून केलेल्या प्रवासामुळे मानसिक समाधान मिळते आणि आर्थिकदृष्ट्याही ते कसे फायदेशीर ठरते, याविषयीही त्यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. विविध देशांमधील पर्यटनस्थळे, संस्कृती, महत्त्वाच्या वास्तू, चित्रप्रदर्शन, पुस्तकांची दुकाने, खाद्यपदार्था यांसह प्रवासासाठी काय तयारी करावी, याचीही माहिती पुस्तकातून मिळते. फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, रशिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, इंग्लड अशा विविध देशांची माहिती मिळते.
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : १७६,
मूल्य : ३०० रु.