

Marathi Book Reviews
esakal
जगविख्यात लेखक सी. एस. लुईस यांच्या ‘क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’ ह्या मालिकेतील ‘द लायन, द विच अँड द वॉर्डरोब’ या पुस्तकाचा अनुवाद वाचकांच्या भेटीस आला आहे. कीर्ती परचुरे यांनी अनुवाद केला आहे. जादुई जगाची रंजक सफर घडवणारी ही कादंबरी केवळ मुलांसाठीची गोष्ट नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात खोलवर असलेल्या निरागसपणाची ही गोष्ट आहे. त्यामुळेच तर गेल्या ६० वर्षांपासून ही कादंबरी वाचकांच्या मनात घर करून बसली आहे. नुकताच प्रकाशित झालेला ह्या कादंबरीचा अनुवाद वाचकांना आवडेल, हे निश्चित!
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १२६,
मूल्य : १९९ रु.