प्रसिद्ध शेफ संजीव कपूर काही वर्षांपूर्वी गोरेगावच्या फिल्मसिटीमधील शूटिंग संपल्यानंतर आरे रोडवरील सप्रेंच्या हॉटेलमध्ये एक पदार्थ शोधत आले. इथे दही घातलेली चटणी मिळते, असं त्यांना कुणीतरी सांगितलं होतं. इतक्या मोठ्या शेफला आपल्या हॉटेलमध्ये पाहून सर्वप्रथम अनिल सप्रे थोडे गोंधळून गेले. आपल्या छोटेखानी हॉटेलमध्ये हे का आले असावेत, असा प्रश्न त्यांना पडला.