Marathi Language : आमची मराठी नेमकी कोणती? मिलेनियल आणि जेन झी पिढीच्या भाषेचा बदलता चेहरा

Marathi Language and Generational Change : मिलेनियल आणि जेन झी पिढीच्या भाषेतील बदल, इंग्रजीचा वाढता वापर, रोमन लिपीतील मराठी आणि बदलत्या सांस्कृतिक संदर्भांमधून भाषेचे बदलते स्वरूप समजून घेणारा लेख.
Marathi Language and Generational Change

Marathi Language and Generational Change

esakal

Updated on: 

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

केवळ संवाद साधणं इतकंच भाषेचं काम नसतं. सांस्कृतिक संचित जतन करण्याचं कामही भाषा कळत-नकळत करत असते. त्यामुळे जसजसे संस्कृतीत-पर्यायाने जगण्यात बदल होत जातात, तसतशी भाषाही बदलत जाते...

दिवाळी अंकासाठी लेख लिहाल का, अशी विचारणा करण्यासाठी संपादकांचा फोन आला. विषय होता, ‘आमची मराठी’. आमची म्हणजे माझी, माझ्या पिढीच्या लेखक-कवींची.

‘‘जरा विचार करून सांगतो,’’ असं म्हणालो. संपादकांनी त्यांना अभिप्रेत असलेली आजची भाषा, त्यातले बदल, इंग्रजीचा वापर वगैरे मुद्दे सांगितले असले तरी मला त्यापलीकडे विचार करायचा होता. स्पष्टता न आल्याने मी वेळ मागून घेतला. विचार करताना मला ‘आमची’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांच्या थोडं खोलात जावंसं वाटलं.

भाषेला संदर्भ असतात आणि कोणत्याही भाषेतले शब्द हे त्या-त्या संदर्भानुसार बदलतात. ‘आमची’ या शब्दामागे आजच्या पिढीची, समकालीन लेखक-कवींची किंवा पिढीची भाषा असा अर्थ अभिप्रेत होता. मग आता आजची पिढी किंवा माझ्या समकालीन असलेली पिढी म्हणजे कोणती? तर साधारण माझ्या वयाची, म्हणजे पस्तीस-चाळिशीच्या आसपासची. अधिक व्यापक करायचं तर आजच्या काळाच्या जाणिवा, या काळातले बदल, ताणेबाणे ज्यांच्या लेखनातून व्यक्त होताहेत अशी पिढी. म्हणजे मिलेनियल पिढी. किंवा आता चर्चेतली जेन झी पिढी. काही कोटी लोक मराठी भाषा बोलतात. तिची लिपी देवनागरी असली, तरी गेल्या काही वर्षांत मोबाइल-कॉम्प्युटर आल्यानंतर ती रोमन लिपीतही (एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवरची मराठी) लिहिली जाते.

Loading content, please wait...