Marathi Literature and Biographies : मराठी साहित्याचा नवा खजिना: 'ते बहात्तर दिवस' आणि 'अक्षरछाया' ग्रंथांचे स्वागत

Taslima Nasrin Andharatil Divas Marathi : मराठी साहित्यातील विविध प्रवाहांना कवेत घेणारा हा साप्ताहिक पुस्तक परिचय आहे. यात ऐतिहासिक कादंबरीपासून ते आधुनिक शेती प्रयोगांपर्यंतच्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे.
Taslima Nasrin Andharatil Divas Marathi

Taslima Nasrin Andharatil Divas Marathi

esakal

Updated on

ते बहात्तर दिवस

डॉ. अविनाश सोवनी लिखित एक लघुकथा, दोन दीर्घकथा आणि एक प्रदीर्घ कथा अशा एकूण चार कथांचा हा छोटेखानी संग्रह आहे. या संग्रहात हळव्या प्रेमकथा नाहीत किंवा अवतीभोवतीचे भयाण वास्तव दाखवणाऱ्या टोकाच्या सामाजिक सत्यकथाही नाहीत. बऱ्याचशा ‘फँटसी’ किंवा कल्पनारम्यतेकडे झुकणाऱ्या, परंतु वाचकांना ‘असं खरंच घडायला हवं होतं का?’ असा विचार करायला लावणाऱ्या कथा आहेत. या कथा वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत; पण त्याचबरोबर त्याचे घटकाभर मनोरंजनही करणाऱ्या आहेत. या कथा वाचताना अशा घटना भूतकाळात कधी घडल्या नाहीत किंवा वास्तवात कधी घडतील असे वाटत नाही, असं मत वाचकाचं होतं. मात्र, लेखक म्हणतात त्या प्रमाणे अशा घटना भविष्यात घडणारच नाहीत असंही नाही.

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे पृष्ठे : १६० मूल्य : ३०० रु.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com