History of Marathi Language : ‘प्रमाण’ मराठीचे समग्र चिंतन

History of Marathi Standard Writing : मराठीच्या प्रमाणलेखनाच्या चारशे वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करताना हे पुस्तक व्याकरण, भाषातज्ज्ञांचे विचार, संस्थांचे योगदान आणि भाषेप्रती सांस्कृतिक जबाबदारीचा सखोल मागोवा घेते.
History of Marathi Language

History of Marathi Language

esakal

Updated on: 

जयदीप पाठकजी - Jaydeep.Pathakji@esakal.com

अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या मराठीच्या प्रमाणलेखनाबद्दल आपल्याकडे सातत्याने चर्चा झडत असतात. प्रमाणलेखनाला व्याकरणाच्या काटेकोर नियमांची चौकट हवी, की जे काही लिहिले आहे त्यामागील भावना महत्त्वाची वैगरे मुद्देही या चर्चेत असतात. ‘मागोवा मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास’ हे पुस्तक प्रमाणभाषेच्या अंदाजे ४०० वर्षांच्या जडणघडणीचा साक्षेपी आढावा घेण्याचे काम करते. डॉ. नागेश अंकुश यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रमाणलेखनाकडे केवळ व्याकरणाच्या चौकटीतून पाहत नाही, तर भाषेच्या सांस्कृतिक जबाबदारीच्या अंगाने उहापोह करण्याचे काम करते.

प्रमाणभाषेबद्दल विविध व्यासपीठांवरून, नियतकालिकांतून आणि पुस्तकांतून झालेल्या चर्चा आणि त्या अनुषंगाने भाषेबद्दलची सविस्तर मांडणी लेखक करतो. प्रमाणलेखनाचे नियम, महत्त्वाचे घटक या संपूर्ण प्रक्रियेत विविध संस्थात्मक योगदान याकडे लेखक अभ्यासकाच्या नजरेतून पाहतो. प्रमाणभाषेबद्दल भाषातज्ज्ञांनी जे काही विचार मांडले आहेत, ते वाचकांपुढे ठेवतो. मराठीच्या प्रमाणलेखनाकडे मराठी लोकांचेच होणारे दुर्लक्ष, प्रमाणलेखनाबाबतची अनास्था, संवेदनशीलतेचा अभाव असे सारे काही लेखकाला सातत्याने खटकत गेले आणि मग त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली असावी, असे जाणवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com