Bandu Pavya Devmanus Story : जनसेवा हीच ईश्वरसेवा (अर्थात बंडूचे बंड-पार्ट २)

Bandu Pavya Devmanus Story : गिरीश कुलकर्णी यांच्या उपरोधिक कथेत, निरंजन (बंडू) हा तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पव्याला भेटून पैसा आणि जीवनातला अर्थ शोधतो आणि कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेत गुन्हेगारीतून राजकारणात प्रवेश करून 'जनसेवा' करण्याचे नवीन अर्थ स्थापित करतो, ज्यामुळे पारंपरिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा त्याचा बाप हताश होतो.
New Marathi Book

New Marathi Book

esakal

Updated on

बंड्यानं पव्याची भेट घेतली आणि त्याला जीवनात अर्थ सापडला. म्हणजे पैसा या अर्थानेही सापडलाच. त्याबरोबरच त्याला जगण्याचं कारणही मिळालं.

इतके दिवस पव्याबद्दल त्याला, चित्रपटात काम करणाऱ्या लोकांबद्दल सामान्य प्रेक्षकाला वाटणारं भाबडं कुतूहल आणि एक विचित्र कृष्णाकर्षण होतं. म्हणजे पतीसमवेत नित्य व्यवहारात गुंतलेल्या विवाहित गोपिकेला जागेपणी कृष्णस्वप्न दिसावे आणि तिच्या ठायी अपराधीपणाची क्षीण भावना उमलत असताना ती दूर सारून परत स्वप्नप्रदेशी जाण्यासाठी डोळे झाकून अट्टाहासी प्रयत्न करण्याचा तिच्या मनाने तगादा लावावा, तसे काहीसे बंडूला पव्याची आठवण आल्यावर होत असे. मोठे त्रांगडेच. बंडू तसा सरळमार्गीच. पण ही विचित्र भूल मात्र पडत होती आणि ही भूल जो पाडतो तो देव आहे की माणूस? या प्रश्नाचं ‘देवमाणूस’ हे सोपं उत्तर त्याला आज भेटीअंती सापडलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com