

Marathi Classical Language Status
esakal
गांभीर्यपूर्वक वाचन करणारा वर्ग प्रत्येक पिढीत टक्केवारीच्या हिशेबाने कायम असतो. हीच मंडळी मराठीच्या एकूण गोमटेपणाला धीरोदात्तपणे, हळूहळू पुढे नेत राहतील. साहित्य संमेलनाच्या दरवर्षी होणाऱ्या उत्सवाबाबत तरुण व नव्या पिढीला आस्था वाटत असली, तरी संमेलनाशी स्वतःला जोडून घ्यावे असे त्यांना क्वचितच वाटत असावे. म्हणूनच साहित्य संमेलनांत तरुणांची उपस्थिती कमी असते. मात्र, समाज पुन्हा एकदा ग्रंथप्रेमाकडे व वाचनसंस्कृतीकडे वळत असल्याचे चित्र आशादायक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा बदल घडताना दिसतो. हा सूचक व शुभ संकेत मानता येईल.