Premium|Master Dinanath : काळाच्या उदरातले फक्‍त नियतीलाच माहीत असते...

Master Dinanath Mangeshkar and Family Life : कठीण आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीत मास्टर दीनानाथ यांना माईंची मिळालेली साथ, विजयाबाईंचा भावनिक निरोप आणि नव्याने सुरुवात करण्याचा त्यांचा निर्धार यांचे हृदयस्पर्शी चित्रण.
Master Dinanath

Master Dinanath

esakal

Updated on: 

हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com

मास्टर दीनानाथ यांना सगळेच सोडून गेले; परंतु अशा कठीण परिस्थितीत माई त्यांच्या मागे ठामपणे उभ्या होत्या. त्यांनी त्यांना उभारी दिली. दीनानाथ यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुक तर केलेच, परंतु काय आणि का घडत आहे याबद्दल त्यांना समजावून सांगितले. मास्टर दीनानाथ आणि माईंमधला तो संवाद अलौकिकच असा. पंडित हृदयनाथ त्यावेळचा सारा काळ आज जागा करत आहेत...

दीना! तू धीर, उदार, गंभीर आहेस.

धैर्याचा महामेरू आहेस.

नेती, नेती, करणारा तू मुमुक्ष नाहीस.

तू नित्यमुक्त आहेस.

‘जैसे कमल पत्र जल वासा’

तसा तू आहेस.

तुला सर्व सोडून गेले. पण तुला कुणी

विसरून जाणार नाही.

मी आणि विजयताई आज तुला सोडून

जात आहोत. पण तुला विसरून

जाणार नाही.

जो पर्यंत संगीत नावाची एक संवेदना

जीवंत आहे. तो पर्यंत तू आमच्या बरोबर

आहेस. चल विजयाताई, दीनाला नमस्कार

करून आपण निघूया.’’

मालकांच्या पाया पडून दोघे जड पावलांनी बाहेर पडली. दोघे बाहेर पडणार, तोच विजयाबाई परत मागे धडपडत आल्या, आणि मालकांना मिठी

मारून रडू लागल्या. मग सगळ्यांनी त्यांना समजावले. आणि मग बऱ्याच वेळाने त्या

रडत रडत दाराबाहेर पडल्या,

बाहेर पडताना विजयाबाई

मालकांकडे वळून वळून बघत होत्या.

Loading content, please wait...