
एखाद्या राजकीय पक्षाची देशाच्या पातळीवरील लोकप्रियता मोजणारा मापदंड कोणता? तर सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी सदर पक्षाची लोकप्रियता प्रतिबिंबित करते असे म्हणता येईल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी अनुक्रमे ४५, ४८, ४५ एवढी विक्रमी होती. हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मोडता आलेला नाही.