

Hardik Singh Khel Ratna
esakal
केंद्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येत असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी यंदा भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडू हार्दिक सिंगच्या नावाची शिफारस करण्यात आली. या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेला हार्दिक एकमेव खेळाडू होय. मागील दोन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावलेल्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या हार्दिकने आगामी काळात विश्वकरंडक, आशियाई क्रीडा स्पर्धा व लॉस एंजेलिस ऑलिंपिक या तीन महत्त्वाच्या क्रीडा महोत्सवांमध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा ध्यास बाळगला आहे.