Katha Arunachi Marathi Play : मिलिंद शिंदे यांची 'कथा अरुणाची' नाटकातील संघर्षमय यात्रा

Vinay Apte Direction Style : 'कथा अरुणाची' नाटकाच्या पडद्यामागचा थरार! विनय आपटे यांची 'लीडिंग फ्रॉम फ्रंट' वृत्ती, अरुणा शानबाग यांच्या जीवनावरील नाटकाचा तो अंगावर येणारा प्रसंग आणि मिलिंद शिंदे यांची अभिनयातील 'गंभीर' नीती.
Katha Arunachi Marathi Play

Katha Arunachi Marathi Play

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे

‘कथा अरुणाची’ नाटक जवळपास बसलं होतं. दोन्ही अंक तयार होते; पण पहिल्या अंकाच्या शेवटचा प्रसंग जिथे दलपत (मी) अरुणावर (चिन्मयी) अतिप्रसंग करतो, तो प्रसंग मला काही जमत नव्हता. एके दिवशी मी न राहवून विनय आपटे सरांना म्हणालो, ‘‘सर एकदा तुम्ही मला हा एवढा सीन करून दाखवा प्लीज...’’ हॉलमध्ये शांतता भरली... विनय सरांनी एकदा माझ्याकडे पाहिलं. हॉलमध्ये जमलेल्या इतरांकडे पाहिलं... ती स्फोटक शांतता कुठल्याही दिशेनं प्रवाहित होऊ शकली असती; पण विनय

सर त्यांचं देखणं हसले. तणाव ढिला झाला...

मी मोहन काकांचा ‘चारशे तीस सव्वीस ऐंशी’ नंबर डायल केला. रिंग जात होती. तशी मनात चिंता दाटत होती. उचलतील की नाही? उचलल्यानंतर काय बोलतील? फोन उचलला गेला. तोच कडक आवाज आला पलीकडून, ‘‘कोण?’’

‘‘काका मी मिलिंद शिंदे...’’

‘‘हा...’’

‘‘येऊ का थोड्या वेळात, म्हणजे तासाभरात येतो...’’

‘‘ये...’’ मोहन काकांनी नेहमीप्रमाणे मोजकं बोलून फोन ठेवला. त्यांचा कडक आवाज मनाला टोचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com