मनाचे व्यवस्थापन

मन म्हणजे माणसाच्या हृदयाची किल्ली! मन म्हणजे जीवन वृक्षाचे मूळ, मन म्हणजे विचार नौकेचे सुकाणू, मन म्हणजे कार्यशक्तीचा आधार.
मनाचे व्यवस्थापन
मनाचे व्यवस्थापनsakal

मनही एक कल्पना मात्र आहे. दिसत नाहीत, स्पर्श करता येत नाहीत अशा असंख्य गोष्टी जगात आहेत त्यापैकी मन हे सर्वश्रेष्ठ आहे मनाची शक्ती अपार आहे. त्याचे कर्तृत्व अलौकिक आहे. मन माणसाला मारते आणि मनच माणसाला तारते. मन म्हणजे माणसाच्या हृदयाची किल्ली! मन म्हणजे जीवन वृक्षाचे मूळ, मन म्हणजे विचार नौकेचे सुकाणू, मन म्हणजे कार्यशक्तीचा आधार.

आज आपण जरा एका कल्पनाविश्वात भरारी मारून येऊ. असा विचार करूया की एखादा पोक्त गृहस्थ रस्त्याने पायी चालला आहे. रणरणत्या उन्हात चालून त्याचा घसा कोरडा पडतो. पाणी कुठे मिळेल का ? या शोधक नजरेने तो इकडे तिकडे बघतो. तो समोरच्या इमारतीतील दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरच्या एक बाई त्याला विचारतात, पाणी देऊ का प्यायला? थकलेले दिसत आहात. त्या गृहस्थांनी मानेनेच होकार दिला आणि त्याच्या मनात विचार डोकावले,"खरेच, किती माणुसकी आहे या बाईजवळ! न मागताच त्यांनी माझी गरज जाणली."अपार कृतज्ञता मनात दाटून आली.

पण अरेच्चा, पाच मिनिटे झालीत दहा मिनिटे झालीत तरी बाईचा पत्ताच नाही. त्या गृहस्थाच्या मनाचा आता त्रागा सुरू झाला. चिडून त्यांनी मनात म्हटले, कशाला आपण खूप चांगले असण्याचे नाटक करावे या बाईनी. सगळे जगच आज नाटकी झाले आहे. या बाई त्याला कशा अपवाद असणार? रागारागाने ते गृहस्थ पुढे जाणार इतक्यात मागून आवाज आला.''काका यांबा... हे बघा मी आणलंय तुमच्यासाठी पाणी." अहो, मी विचार केला नुसतं पाणी देण्यापेक्षा लिंबू-पाणी देणे तुम्हाला योग्य राहील. ते करेपर्यंत झाला खरा उशीर...!"

आता त्या गृहस्थांच्या मनातील विचारांनी पुन्हा पलटी खाल्ली. "किती सात्त्विक विचार आहे बाईंचा आणि आपण मात्र उशीर झाला म्हणून मनातल्या मनात चरफडत होतो. "काका, घ्या ना हे लिंबू-सरबत"असे म्हणताच गृहस्थाची विचारसाखळी तुटली. सरबताचा एक घोट घेतला मात्र पुन्हा मन वदले, सरबत म्हणजे काय, ते कसे करायचे ही साधी गोष्टदेखील या बयेला साधलेली दिसत नाहीय." ही नाराजी त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर दिसली.

ती महिला म्हणाली विचार करूनच मी त्यात साखर घातली नाही. पण मी छोट्या डबीत साखर आणलीय आणि चमचाही।'' असे म्हणून तिने साखर घोळवायला घेतली आणि बोलली. साखर टाकून मी जर सरबत आणले असते आणि तुम्हाला साखर न चालणारी असती माझा उगाच पुन्हा वेळ गेला असता. बाईचा चतुरस्र आणि दूरगामी विचार ऐकूण त्या गृहस्थाचे डोळे पाणावले. मनात गहिवर दाटून आला.

वरील कल्पनाविश्वातून बाहेर आल्यावर आपल्याही मनात विचार येतो की घटना एकच. क्षणाक्षणाला घटनेतील स्थित्यंतरानुसार सतत विविधांगी विचार करणारे मनही एकच. पण एकाच मनात पहा क्षणकाळात कितीतरी विचारांची आंदोलने झालीत. घटकेत सकारात्मक तर घटकेत नकारात्मक. अशाप्रकारे मानवी मन हे आपले परममित्र आहे. तसेच ते मोठे शाही आहे. मोक्षप्राप्त करून देणारे मनच तर मवबंधनात जखडून ठेवणारे मन च असे हे मन माकडासारखे चंचल असते, वाऱ्यासारखे कुठेही जाते-येते आणि सूक्ष्मरूपाने प्रवेश करते. मन भूतकाळात आणि भविष्यकाळातही मुक्त संचार करते. मन पाखरू पाखरू दाही दिशा बाके फिरू, देह असे बंधनात अमुचा मन आमुचे मुक्त, मन चंगा तो कयौटे मे गंगा, मन चिंती ते वैरी न चिंती अशी मनाविषयीची कितीतरी वचने आपण नित्यसहज बोलतो आणि ऐकतो. मनाची महती आपण नानाप्रकारे वर्णन करतो. पण हे मन म्हणजे नेमके काय आहे? कुठे आहे? कसे आहे हे कुणालाच सांगता येत नाही. अनेक शस्त्रक्रिया नाकारणारे वैद्य म्हणतात, आम्ही शेकडो शस्त्रक्रिया केल्या, न जाणो कित्येकवेळा मनुष्यदेह आडवा-उभा चिरला पण आम्हाला कुठेही मन म्हणून आढळले नाही.

मनाचे व्यवस्थापन
‘संवर्धित शेती’चे उपयुक्त तंत्र

तर..अशा या चंचल पण सर्वशक्तिमान मनाला काबूत राखण्यासाठी आपल्याला हवेत से वळविण्यासाठी मनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हे व्यवस्थापन करण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टी दाखवा, ऐकवा, शिकवा. म्हणजे ते वाईट गोष्टींकडे वळणार नाही. अरे,हे करू नको, हे वाईट आहे असे नकारात्मकरित्या मनाला सांगू नये. कारण करू नये म्हटले की ते हटकून करणार असे मन शहाणे असते. एकदा एका साधकाला त्याच्या खोडकर मित्राने सांगितले, तू ध्यानाला बसशील तेव्हा डोळ्यासमोर माकड येऊ देऊ नकोस. झाले. तो साधक माकड नको, माकड नको म्हणत ध्यानाला बसला. आणि त्याच्यासमोर जे माकड आले ते काही हटेना आणि ध्यान काही लागेना. हाच मनाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा मुद्दा होय. काय द्यावे, काय घ्यावे, काय करावे, काय चिंतावे तेच पुन्हा पुन्हा सकारात्मकरित्या सांगावे.

मनाचे व्यवस्थापन
खानदेशची नवलाख मालन 'कानबाई'

मनाच्या व्यवस्थापनात एक मनोवैज्ञानिक उपाययोजना आहे. एखाद्याला पुन्हा पुन्हा चांगले म्हणावे, गोंजारावे म्हणजे तो चांगला होतो. हाच दृष्टिकोन समोर ठेऊन समर्थ रामदास स्वामींनी हे सज्जन मना असे संबोधून मनाला चुचकारलं आहे, आळवले आहे, त्याची श्लोकातून स्तुती केली आहे. हा मनाचा स्वभाव ओळखूनच ध्यान-धारणा-साधना या माध्यमातूनही मनाचे योग्य व्यवस्थापन साधले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com