- दुलारी देशपांडे, dularid111@gmail.com
जुन्या हैदराबादमध्ये निजामकाळापासून चालत आलेल्या अत्यंत गरीब मुसलमानांच्या वस्त्या आहेत. त्यातली काही कुटुंबं आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरच्या मोठ्या मुलींचे आखाती देशातल्या वयस्कर श्रीमंत अरब शेखांशी बेकायदा निकाह लावून देत आहेत. स्त्रीवादी विचारांच्या उर्दू कवयित्री, संपादिका, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जमीला निशात आणि त्यांची ‘शाहीन’ संघटना २५ वर्षे अशा प्रकारच्या निकाहाद्वारे अरब शेखांच्या वासनेला बळी पडलेल्या मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य करीत आहे. त्यांच्याशी केलेली बातचीत...