Cinderella Story in Modern Times : वसईच्या वस्तीतली ‘सिंड्रेला’; सावत्र आईच्या छळातून शिक्षणासाठी सुरू झाला संघर्ष

Cinderella Life in Mumbai Slum : वसईच्या वस्तीत सावत्र आई आणि बहिणींच्या छळात वाढणाऱ्या सिंड्रेलाच्या आयुष्यात शिक्षण, गरिबी, भेदभाव आणि घरकामाचा संघर्ष आहे; मात्र तिच्या आयुष्यातही स्वप्नांना नवी दिशा मिळते.
Cinderella Story in Modern Times

Cinderella Story in Modern Times

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी

सावत्र बहिणी आणि आईच्या छळाला कंटाळलेली सिंड्रेला परीच्या मदतीने एका पार्टीत जाते आणि तिथे तिला राजकुमार भेटतो. अशी सिंड्रेलाची जुनी कथा आताच्या काळात घडली तर कशी असेल ते आजच्या कथेत वाचा.

सिंड्रेला ही मुलगी वसईच्या एका वस्तीत आपले वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणींबरोबर राहत होती. सावत्र आईने मुलांचा छळ करण्याची आपल्याकडे प्रथा आहे असे सावत्र आईला, सावत्र आईच्या सख्ख्या आईने सांगितलेले होते. त्यामुळे आईच्या शिकवणुकीप्रमाणे सिंड्रेलाची सावत्र आई तिचा फार छळ करत असे. सावत्र बहिणींना खासगी शाळेत तर सिंड्रेलाला सरकारी शाळेत दाखल केलेले होते. सिंड्रेला कधी शाळेत जात असे तर कधी घरची कामे खूप असल्याने तिला शाळेत जाणे जमत नसे. पण ज्या दिवशी शाळेत खीर किंवा खिचडी मिळत असे, त्या दिवशी मात्र सिंड्रेलाची आई तिला मुद्दाम शाळेत पाठवत असे. तांदूळ मिळाले तर सिंड्रेलाला त्याच्या इडल्या करायला लावत असे.

सिंड्रेलाला लहानपणीपासून गाण्याची खूप आवड होती. भांडी घासताना, मिक्सर चालू असताना, कुकरच्या शिट्ट्या वाजताना ती मोठ्याने गाणे म्हणून बघत असे. कारण आईला तिने गाणे म्हटलेले अजिबात आवडत नसे. शाळेच्या गाण्याच्या स्पर्धेत तिने कित्येकदा गुपचूप नाव दिले होते. एका स्पर्धेत तिला बक्षिसेदेखील मिळाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com