Theatre Audience : नाटकातील प्रेक्षक: साक्षीदार की सहभागी?

Role of audience in contemporary theatre experience : नाटक म्हणजे केवळ करमणूक नसून जिवंत अनुभव आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्या उपस्थितीत घडणारा हा क्षण प्रेक्षकाला विचारशील साक्षीदार बनवतो. असहमतीतूनही नाटकाचा आस्वाद घेणं ही प्रगल्भ प्रेक्षकाची ओळख आहे.
Theatre Audience

Theatre Audience

sakal

Updated on

आशुतोष पोतदार

नाटक पाहताना प्रेक्षक घडत असणाऱ्या क्षणाचा साक्षीदार असतो. नाटकातील प्रत्येक नाट्यात्म विधानाशी प्रेक्षकाने सहमती दर्शविण्याची गरज नसते. उलट, असहमती दर्शवत नाटकाचा आस्वाद घेणं हे उपस्थित प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं लक्षण असतं.

नाटक घडण्यासाठी कलाकार आणि प्रेक्षक प्रत्यक्ष असावे लागतात. दोहोंच्या उपस्थितीशिवाय नाटक होऊ शकत नाही. त्यांची उपस्थिती फक्त शारीरिक नसते; ती मानसिक, भावनिक आणि वैचारिक असते. नाटक पाहताना प्रेक्षक ‘काहीतरी बघतो किंवा ऐकतो’ इतकंच नाही, तर तो घडत असणाऱ्या क्षणाचा साक्षीदार असतो. त्याचं साक्षीदार असणं फक्त टाळ्यांच्या कडकडाटात नसतं, तर अवाक् किंवा अस्वस्थ करणाऱ्या पिन ड्रॉप सायलेन्समध्येही असतं. नाटकातील प्रत्येक नाट्यात्म विधानाशी प्रेक्षकाने सहमती दर्शविण्याची गरज नसते. उलट, असहमती दर्शवत नाटकाचा आस्वाद घेणं हे उपस्थित प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचं लक्षण असतं. कथावस्तू, व्यक्तिरेखा आणि मांडणी यांचा कलात्म मेळ घालत नाटक रंगमंचावर मांडलं जातं तेव्हा त्यातून विविध विचार, भावना आविष्कृत होत असतात. यांची अनेकविध आंदोलने प्रेक्षकांच्या मनात तयार होतात. नाटकाशी आणि नाटकातल्या भाव-भावनांशी तादात्म्य पावत असताना प्रेक्षक भारावून जाईल, विचार-प्रवृत्त होऊन अस्वस्थ होईल किंवा स्वतःला आणि भवतालाला प्रश्न विचारेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com