#MokaleVha यौवनाच्या पदार्पणातील राग!

Child
Child

किशोरवयीन मुलांबाबत आईवडिलांना असा प्रश्न पडतो, की आत्तापर्यंत गुलाबाची फुले असणारी आपली मुले अचानक त्यांचे काटे का टोचायला लागले आहेत? इतका आज्ञाधारक मुलगा अलीकडे ऐकेनासा का झालाय? लाडात येऊन बोलणारी माझी मुलगी इतकी उद्धट का वागतेय? हे प्रश्न पडतात. पण, उत्तरे सापडत नाहीत. मुलांना राग आला, की ते वाद घालतात. तुम्ही मोठ्याने बोललात, की जोराने ओरडून बोलतात. कधीकधी किंचाळतातसुद्धा! मनाविरुद्ध झाले आणि रागाचा पारा चढला, की दार आपटणे, वस्तू  फेकणे, तोडणे, क्वचित अपशब्द तर काही वेळा स्वतःला जखमा करून घेतात. यातील वादविवाद, ओरडून बोलणे, हे प्रकार जास्त असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याची प्रमुख तीन कारणे आहेत.

  • या वयात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक तसेच भावनिक पातळीवर बदल होतात. त्या काळात मुले ओव्हरएक्साइटेड असतात. पण, मेंदू मात्र त्या प्रमाणात प्रगत झालेला नसतो.
  • किशोरवयीन मुलांची मानसिकता - ज्यात इरॅशनल थॉट्स आणि त्या विचारांचे किशोरवयीन मुलांनी आपल्या कुवतीनुसार लावलेले अर्थ असतात. 
  • पालकांचे आपल्या मुलांशी चुकीचे आणि नकारात्मक वागणे.

कुठे चुकते?

  • पालकांच्या वर्तनात मुलांच्या रागाची कारणे दडलेली असतात. 
  • काही वेळेला मुलांचे इरॅशनल थॉट्स, त्या वेळच्या परिस्थितीचे त्याचे इंटरप्रिटेशन, त्यांचा राग ते पालकांवर रागाच्या रूपात काढतात. 

कधी मुले चुकतात, तर कधी पालकांचे वागणे रागाला कारणीभूत ठरते. आपल्याला दोन्ही पातळ्यांवर काम करायला हवे. पालक म्हणून मुले चुकली, की आपण त्यांना मारतो, त्यांच्यावर राग काढतो, नकारात्मक शब्द वापरतो. कित्येक वेळेला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, क्षमतेला क्रिटिसाइज करतो. ठरावीक प्रकारची विशेषणे वापरतो. अति कडक पालकत्व त्यांना पटत नाही. आपल्याला काही समजत नाही का, असा प्रश्न मुलांना पडतो. आपण मोठे असतो. त्यामुळे मुलांनी आपल्याशी आदराने वागावे, बोलावे आणि राग व्यक्त करू नये, असे समजणे सयुक्तिक आहे का?
किशोरवयीन म्हणजे मोठे होण्याची प्रक्रिया सुरू झालेले व्यक्तिमत्त्व! मुळात आपल्या युक्त्या, धाक, धमक्या यातला पोकळपणा समजण्याइतके ते हुशार, बिनधास्त झालेले असतात. अशा वेळी आपल्याला काय करायला हवे...  

  • मुलांना मारणे थांबवा.
  • त्यांच्या मित्रांसमोर त्यांच्यावर कमेंट्स पास करू नका.
  • तुमचे निर्णय लादू नका. 
  • संवादात तडजोडीची तयारी ठेवा.

मुलांशी उत्तम नाते तयार करण्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘मुलांशी आदराने वागा’. त्यांना घरातील जबाबदार व्यक्ती म्हणून मते मांडू द्या. त्या निर्णयांच्या बऱ्यावाईट परिणामांची चर्चा होऊ द्या. ती जबाबदारी त्यांना घ्यायला सांगावी; म्हणजे विचार सुरू होतो. त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा, परिस्थितीचा राग येतो ते लिहून काढायला सांगा. आपल्याबाबत काही म्हणणे असेल आणि ते खरे असेल, तर त्या चुका टाळा. पाहा रागाचे प्रसंग कमी होतील की नाही. कारण, मुले काही सांगू इच्छितात, तेव्हा तो आपल्यासाठी एक क्ल्यू असतो. थोडक्यात, किशोरवयीन मुलांशी बोलताना त्यांना आदर देत, आपले शब्द, बोलण्याचा टोन, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, भावना यावर नियंत्रण राहिले; तर मुलांमध्ये आणि तुमच्यात चांगले नाते तयार होईल आणि पुढे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला ते पूरक ठरेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com