#MokaleVha समस्यांवर बोलू काही

Sucheta-Kadam
Sucheta-Kadam

प्रश्‍न - माझ्या लग्नाला १ वर्ष झाले असून, मी ४ महिनेच सासरी राहिले. मला सासरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. मला पुन्हा परतही जायचे नाही, मी काय करू?
- कोणत्याही परिस्थिती, व्यक्तीचा स्वीकार करताना तडजोड करणे हा आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. परंतु, आपल्याला स्वीकारता न येण्यासारखी टोकाची परिस्थिती आहे, तडजोड अशक्य आहे अशी तुमची भावना असेल तर वादविवाद न वाढविता नवऱ्याशी मोकळेपणाने चर्चा करा. जुळवून घेणे अशक्य का आहे, या आरोप - प्रत्यारोपात न अडकता समजावून सांगून परस्पर संमतीने विनाअट घटस्फोटाचा दावा दाखल करून या विवाहबंधनातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वेगळे होणे शक्य आहे. 

प्रश्‍न - माझ्या लग्नाला ४ वर्षे झाली असून, अपत्य नाही. पण कोणतेही कारण न सांगता सासरच्यांनी मला माहेरी पाठवून दिले. नंतर घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली. परंतु, मला घटस्फोट घ्यायचा नाही. 
- कायद्याने घटस्फोट घेण्यासाठी काही नियम अटी यांची तरतूद आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही क्षुल्लक कारणावरून दावा दाखल करता येत नाही. काही वेळेस खोटे आरोप लावून दावा दाखल होऊ शकतो. परंतु, ते आरोप सिद्ध झाले तरच केस पुढे चालू शकते. तुम्ही सांगितलेल्या कारणावरून घटस्फोट अशक्य आहे. न्यायालयामध्ये सज्ञान पती-पत्नीला समोरासमोर तसेच वैयक्तिक समुपदेशन करून समझोत्याचे प्रयत्न सर्वप्रथम होतात. तुम्ही तुमची बाजू न घाबरता सांगा. मला हे लग्न टिकवायचे आहे, हे स्पष्ट केल्यास विनाकारण एकतर्फी समजून न घेता घटस्फोटाचा निकाल दिला जात नाही. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com